मुक्तपीठ टीम
बंडखोर शिंदे गटातील मंत्री आणि बंजारा समाजाचे नेते संजय राठोड यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. नेहमी पाठीशी उभा राहणारा बंजारा समाज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना पाठिंबा देणार असल्याची माहिती समोर आली आहे. पोहरादेवी गडाचे तीन मंहत व पन्नास ते साठ टक्के बंजारा समाजाचे प्रतिनिधी मातोश्रीवर जाउन शिवबंधन हातावर बांधणार आहेत. हे सर्व उद्धव ठाकरेंना पाठिंबा देत शिवसेनेचा भगवा हातात घेणार आहेत, अशी माहिती पोहरादेवीचे महंत सुनील महाराज यांनी दिली आहे.
संजय राठोड यांना मोठा धक्का!!
- वेळोवेळी संजय राठोडांची पाठराखण करणाऱ्यापैकी तीन महंत शिवबंधन बांधणार आहेत.
- त्यांच्या सोबत समाजातील अनेक नेते आणि पन्नास ते साठ टक्के बंजारा बांधवांचे प्रतिनिधीही शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
- या माहितीला सुनील महाराज यांनी दुजोरा दिला आहे.
- येत्या तीन दिवसात बंजारा समाजाचे लोक मातोश्रीवर जाउन शिवबंधन हातावर बांधणार आहेत.
- हे सर्व उद्धव ठाकरेंना पाठिंबा देत शिवसेनेचं शिवबंधन हाती बांधणार आहेत.
- बंजारा समाजातून महत्वाच्या व्यक्तींनी शिवसेनेत प्रवेश केल्यास संजय राठोड यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
- यामुळे संजय राठोड यांच्या राजकीय अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होणार आहे.
संजय राठोड, बंजारा समाज आणि शिवसेना!
- पोहरादेवी हे बंजारा समाजाचे सर्वात मोठे शक्तीपीठ आहे.
- या गडाच्या महंतांचा आदेश बंजारा बांधव शिरसावंद्य मानतात.
- संजय राठोड यांनी शिवसैनिक म्हणून त्यांनी राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली.
- वयाच्या अवघ्या २७ व्या वर्षी ते १९९७मध्ये यवतमाळ शिवसेनेचे जिल्हाप्रमुख झाले होते.
- विशेष म्हणजे संजय राठोड यांनी २००४ च्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे यांचा पराभव केला.
- २००९ मध्ये त्यांनी क्रीडा राज्यमंत्री संजय देशमुख यांचा पराभव केला.
- यानंतर शिवसेना पक्षात त्यांचे महत्त्व वाढले.
- मंत्री संजय राठोड यांना उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर भाजपाच्या आक्रमकतेमुळे पद सोडावे लागले.
- पण एकनाथ शिंदेंनी बंडखोरी करत भाजपाच्या सोबत सरकार स्थापन केले. भाजपाचे फडणवीस आणि शिंदे गटाच्या मंत्रिमंडळात पुन्हा स्थान मिळाल्यानंतर राठोडांनी याच पोहरादेवी येथे मोठं शक्ती प्रदर्शन केलं.
- याच गडाच्या महंतांनी संजय राठोडांना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे दबाव आणून मागणी केली होती.
- उद्धव ठाकरेंनी काही दिवसांपूर्वी पोहरादेवी दर्शनाला येण्याची घोषणा केली होती, त्याला समाजातून चांगला प्रतिसाद मिळाला.
- आता त्याआधीच महंतांच्या आणि बंजारा समाजातील प्रमुख मान्यवरांच्या शिवसेनेकडे जाण्याची बातमी आल्याने राठोडांना मोठा धक्का आहे.