मुक्तपीठ टीम
अंधेरी आणि दादरनंतर आता वांद्रे स्थानकाच्या कायापालटाची जोरदार तयारी सुरू आहे. वांद्रे स्टेशन इमारतींसह रेल्वेची जागा विकसित करण्याची रेल्वेची योजना आहे. येथे पंचतारांकित हॉटेल, कार्यालये किंवा निवासी इमारती बांधल्या जातील. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यासोबत नुकत्याच झालेल्या बैठकीत या योजनेबाबत चर्चा झाली. इंडियन रेल्वे स्टेशन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन वांद्रे येथे जमीन विकसित करण्याचा विचार करत आहे. जेथे कर्मचारी घरे आहेत आणि लांब पल्ल्याच्या गाड्या थांबवण्यासाठी करण्यासाठी ट्रॅक टाकण्यात आले आहेत. प्रवाशी भाड्याव्यतिरिक्तच्या महसुलातून तब्बल ४० हजार कोटी रुपये गोळा करण्याची योजना आहे.
वांद्रे रेल्वे स्थानक संकुलातच पंचतारांकित हॉटेल!
- वांद्रे हे प्रमुख ठिकाण असण्याबरोबरच लांब ठिकाणांच्या गाड्यांचे केंद्र आहे.
- खार, वांद्रे लोकल आणि वांद्रे टर्मिनस दरम्यान पूर्वेला असलेल्या जमिनीवर नवीन प्रकल्प बांधण्याची रेल्वेची योजना आहे.
- सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, व्यावसायिक कार्यालयांसाठी बहुमजली इमारत आणि पंचतारांकित हॉटेल किंवा कदाचित निवासी इमारत बांधली जाईल.
मात्र, रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, या सर्व संभाव्य शक्यतांवर चर्चा केली जात आहे. परंतु, अजूनही अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही. तसेच रेल्वे ओव्हर ब्रिज बांधण्याची योजना आहे. एसव्ही रोड आणि वांद्रे (पूर्व) यांना वांद्रे स्थानकापासून जोडण्यासाठी रेल्वे प्रशासन रेल्वे ओव्हर ब्रिज बांधण्याचा विचार करत आहे. याशिवाय लोकल स्टेशनवर नवीन उपनगरीय प्लॅटफॉर्म बांधण्याची योजना आहे. हार्बर लाईनसाठी एक नवीन प्लॅटफॉर्म तयार केला जाईल. जेव्हा मुंबई सेंट्रल पासून लांब ठिकाणांच्या गाड्यांसाठी वेगळा कॉरिडॉर बनवला जाईल.