Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आता दार्जिलिंग, आसामसारख्या उत्कृष्ट चहामध्ये ‘परदेशी’ भेसळ चालणार नाही!

'परदेशी' निकृष्ट चहा पावडर 'भारतीय' म्हणून विकण्यावर बंदी, आयातीवर कठोर कारवाई

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
tea powder

मुक्तपीठ टीम

दिवसाच्या सुरुवातीला चांगल्या चहाचा पहिला घोट म्हणजे दिवसाची मस्त सुरुवात मानली जाते. त्यातही दार्जिलिंग/कांगडा/आसाम/निलगिरी या पारंपरिक चहाची लज्जतच वेगळी. पण गेल्या काही दिवसांपासून या उत्कृष्ट भारतीय चहांमध्ये निकृष्ठ दर्जाच्या परदेशी आयात चहाची भेसळ होऊ लागल्याच्या तक्रारी येत होत्या. त्याची गंभीर दखल घेत टी बोर्डाने कडक पावले उचलली आहेत.

 

निकृष्ट दर्जाची चहा पावडर भारतात आयात आणि वितरित होणार नाही हे सुनिश्चित करण्यासाठी केंद्राने कठोर पाऊल उचलले आहे. यासंदर्भातील अधिसूचना नुकतीच जारी करण्यात आली . वाणिज्य आणि उद्योग मंत्र्यांच्या निर्देशानुसार, चहा मंडळाने ११.११.२०२१ रोजी चहा विपणन नियंत्रण आदेश, २००३, चहा (वितरण आणि निर्यात) नियंत्रण आदेश, २००५ अंतर्गत दार्जिलिंग भौगोलिक निर्देशांक (जीआय) चहाच्या संरक्षणासाठी जारी करण्यात आलेल्या चार परिपत्रकांचा तपशील खालीलप्रमाणे :

  • आयात केलेल्या चहाचे उत्पत्ती स्थान त्यांच्या सर्व विक्री पावत्यांमध्ये नमूद केल्याचे सुनिश्चित करणे आणि आयात केलेला चहा मूळ भारतीय चहा म्हणून न देण्याचे सर्व आयातदारांना निर्देश दिले आहेत.
  • देशांतर्गत वापरासाठी स्वस्त आणि निकृष्ट दर्जाच्या आयात केलेल्या चहाचे ,भारतीय मूळ चहासोबत मिश्रण न करण्याचे निर्देश चहाच्या सर्व वितरकांना देण्यात आले आहेत.
  • दार्जिलिंग चहाच्या उत्पादकांना भौगोलिक निर्देशांक (जीआय ) क्षेत्राच्या बाहेरील चहाची हिरवी पाने खरेदी न करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
  • आयात केलेला चहा हा, दार्जिलिंग/कांगडा/आसाम (पारंपरिक)/निलगिरी (पारंपरिक ) या चहासोबत मिसळू नये असे निर्देश चहा खरेदीदारांना दिले आहेत.
  • वरील निर्देशांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी, चहा मंडळाने विशेषतः नेपाळमधील चहाचे वितरक/आयातदार यांची आकस्मिक तपासणी सुरू केली आहे.११.११.२०२१ रोजी सिलीगुडीमधील ३ युनिट्सची आकस्मिक तपासणी करण्यात आली आणि चाचणीसाठी नमुने घेण्यात आले.

 

चहाच्या आयातीत झालेल्या वाढीमुळे देशांतर्गत भारतीय चहा उद्योगावर विपरित परिणाम होत असल्याचे मांडणाऱ्या बातम्या प्रसारित झाल्या आहेत. मात्र हे खरे नाही, असा दावा सरकारने केला आहे. एकूण चहा उत्पादनात आयातीची टक्केवारी साधारणपणे १-२% च्या दरम्यान असते,त्यापैकी मोठ्या प्रमाणात चहा, हा पुन्हा निर्यात करण्यासाठी असून देशांतर्गत वापरासाठी नाही. मूल्यवर्धन आणि मिश्रणाच्या उद्देशाने पुन्हा निर्यात करणे हा भारतात चहा आयात करण्याचा मुख्य उद्देश आहे. भारताच्या चहा उत्पादनाच्या तुलनेत चहाची आयात अत्यल्प आहे.


Tags: adulterated tea powderassamBanDarjeelingforeign tea powderIndiatea powder importआसामकारवाईदार्जिलिंगभेसळयुक्त चहा पावडरमुक्तपीठ
Previous Post

राज्यात ९२५ नवे रुग्ण, ९४५ रुग्ण बरे होऊन घरी!

Next Post

अहमदनगर जिल्ह्यातील कळसुबाई परिसर बियाणे संवर्धन संस्थेला राष्ट्रीय पुरस्कार

Next Post
कळसुबाई परिसर बियाणे संवर्धन संस्था

अहमदनगर जिल्ह्यातील कळसुबाई परिसर बियाणे संवर्धन संस्थेला राष्ट्रीय पुरस्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!