Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

गणेशोत्सवात मुंबई – गोवा महामार्गावर अवजड वाहनांना प्रतिबंध

जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना निर्बंधातून सूट

September 6, 2026
in घडलं-बिघडलं, सरकारी बातम्या
0
MUMbai Pune Express way

मुक्तपीठ टीम

गणेशोत्सव कालावधीत कोकणात जाणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये तसेच त्या मार्गावर ये जा करणाऱ्या अवजड वाहनांमुळे वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी गृह (परिवहन) विभागाने अशा वाहनांना या मार्गावर प्रतिबंध केला आहे. त्या संदर्भातील आदेश दि. २३ ऑगस्ट, २०२२ रोजी जारी करण्यात आले आहेत.            

दि.२७ ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून (००.०१ वाजेपासून) ते दि.१० सप्टेंबर रोजीच्या रात्री आठ वाजेपर्यंत या कालावधीत मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्ग क्र.६६ वर वाळू/रेती व तत्सम गौणखनिजांची वाहतूक करणाऱ्या वाहनांना पूर्णत: बंदी राहणार आहे. परंतु, वरील निर्बंधबंदी दूध, पेट्रोल/डिझेल, स्वयंपाकाचे गॅस सिलेंडर, लिक्वीड मेडिकल ऑक्सिजन, अन्न धान्य, भाजीपाला व नाशवंत माल इत्यादी जीवनावश्यक वस्तू वाहून नेणाऱ्या वाहनांना लागू राहणार नाही. तसेच मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र.६६ च्या रस्ता रुंदीकरण /रस्ता दुरुस्ती कामकाज आणि साहित्य, माल इ. ने-आण करणाऱ्या वाहनांना बंदी लागू राहणार नसल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.            

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाद्वारे गणेश चतुर्थी निमित्ताने कोकणवासीयांच्या सोयीसाठी जादा बसेस सोडण्याची व्यवस्था करण्यात येते.  राष्ट्रीय महामार्ग क्र.६६ वरुन जड वाहने व रेतीची वाहतूक करणारी वाहने यांच्या वाहतूकीमुळे या कालावधीत कोकणाकडे ये-जा करणा-या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढून वाहनांची कोंडी होऊन प्रवाशांची गैरसोय होते, त्यामुळे गृह (परिवहन) विभागाने मोटार वाहन अधिनियम, १९८८ च्या कलम ११५ मधील तरतूदीचा वापर करुन  सार्वजनिक हितास्तव पनवेल ते

इन्सुली (सावंतवाडी) या राष्ट्रीय महामार्ग क्र.६६ (रा.म.क्र.जुना क्र.१७) (पनवेल ते सिंधुदूर्ग मार्गे पेण, वडखळ, नागोठाणे, कोलाड, इंदापूर, महाड, खेड, चिपळूण, संगमेश्वर, राजापूर, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी) वरुन होणारी वाळू/रेती भरलेल्या ट्रकची, मोठ्या ट्रेलर्सच्या तसेच अवजड वाहनांच्या वाहतूकीस प्रतिबंध केला आहे. त्याबाबतचे आदेश विभागाने जारी केले आहेत.            

या आदेशानुसार,  गणेशोत्सवाच्या पूर्वतयारीचा प्रवास/ मुर्तीचे आगमन ( दि.२७.०८.२०२२ रोजी ००.०१ वाजेपासून ते दि.३१.०८.२०२२ रोजी २०.०० वाजेपर्यंत) कालावधीत मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्ग क्र.६६ वर सर्व वाहने ज्यांची वजनक्षमता १६ टन किंवा १६ टनापेक्षा जास्त आहे (जड-अवजड वाहने, ट्रक, मल्टीएक्सल, ट्रेलर इ. वाहने) अशा वाहनांना वाहतुकीसाठी बंदी असेल.            

पाच आणि सात दिवसांच्या गणपतीचे विर्सजन/गौरी गणपती विसर्जन/ काही अंशी परतीचा प्रवास ( दि. ०४.०९.२०२२ रोजी ०८.०० वाजेपासून ते दि.०६.०९.२०२२ रोजी २०.०० वाजेपर्यंत) कालावधीत मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्ग क्र.६६ वर सर्व वाहने ज्यांची वजनक्षमता १६ टन किंवा १६ टनापेक्षा जास्त आहे. (जड-अवजड वाहने, ट्रक, मल्टीएक्सल, ट्रेलर इ. वाहने) अशा सर्व वाहनांची वाहतूक पूर्णत: बद असेल.           

अनंत चतुर्दशी १० दिवसांचे गणपती विसर्जन/ परतीचा प्रवास ( दि.०९.०९.२०२२ रोजी ०८.०० वाजेपासून ते दि.१०.०९.२०२२ रोजी २०.०० वाजेपर्यंत)  या कालावधीत मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्ग क्र.६६ वर सर्व वाहने ज्यांची वजनक्षमता १६ टन किवा १६ टनापेक्षा जास्त आहे. (जड-अवजड वाहने, ट्रक, मल्टीएक्सल, ट्रेलर इ. वाहने) वाहतुकीस पूर्णत: बंद असेल.            

दि.२७.०८.२०२२ रोजी ००.०१ वाजेपासून ते दि.१०.०९.२०२२ रोजी २०.०० वाजेपर्यंत या कालावधीत मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्ग क्र.६६ वर वाळू/रेती व तत्सम गौणखनिजांची वाहतूक करणाऱ्या वाहनांना पूर्णत: बंद करण्यात यावी. परंतु, वरील निर्बंधबंदी दूध, पेट्रोल/डिझेल, स्वयंपाकाचे गॅस सिलेंडर, लिक्वीड मेडिकल ऑक्सिजन, अन्न धान्य, भाजीपाला व नाशवंत माल इत्यादी जीवनावश्यक वस्तू वाहून नेणाऱ्या वाहनांना लागू राहणार नाही. तसेच मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र.६६ च्या रस्ता रुंदीकरण /रस्ता दुरुस्ती कामकाज आणि साहित्य, माल इ. ने-आण करणाऱ्या वाहनांना बंदी लागू राहणार

नाही. यासंदर्भात वाहतूकदारांना संबंधित वाहतूक विभाग/महामार्ग पोलीस यांनी प्रवेशपत्र द्यावे तसेच जे.एन.पी.टी. बंदरातून आयात-निर्यात मालाची वाहतूक सुरळीत राहील याकरीता वाहतुकीचे नियोजन करण्यात यावे असे या आदेशात म्हटले आहे.


Tags: ganeshotsavHeavy VehiclesMumbai Goa Express Wayअवजड वाहनगणेशोत्सवमुंबई-गोवा महामार्ग
Previous Post

साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कारांची घोषणा

Next Post

सततच्या पावसामुळे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्यास मिळणार भरपाई

Next Post
Eknath Shinde

सततच्या पावसामुळे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्यास मिळणार भरपाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!