Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आभाळात झेप घेऊन सर्वांची मदत करणारा ‘बालवीर’ आता चंद्रावर घेणार झेप, अभिनेत्याला कशी मिळाली ही सुवर्णसंधी?

September 5, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
Actor Dev Joshi

मुक्तपीठ टीम

एक काळ होता ज्यावेळी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंतचे बालवीरसाठी वेडे होते. अनेक वर्ष मुलांच्या मनामनात पोहोचलेल्या या काल्पनिक मालिकेला भरभरून प्रतिसाद मिळाला. बालवीर फेम टीव्ही अभिनेता देव जोशीच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. देव जोशी डिअर मून प्रोजेक्टच्या आठ जणांच्या टीमचा भाग आहे. देव पुढच्या वर्षी स्पेस एक्स रॉकेटमधून चंद्राभोवती एक आठवडाभर प्रवास करेल. त्याने याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. तो म्हणाला की, “मी खूप आनंदी आणि उत्साहित आहे.”

देवला कशी मिळाली ही सुवर्णसंधी?

  • देव जोशी जपानच्या अब्जाधीश यासुका मीझावा यांच्या या मिशनमध्ये आहे.
  • देवने याविषयी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे.
  • त्याने दिलेल्या माहितीनुसार, मला नेहमीच अवकाशाबद्दल जाणून घेण्यात रस आहे.
  • जेव्हा मी २०२१मध्ये बालवीरसाठी शूटिंग करत होतो, तेव्हा मला एक जपानी अब्जाधीश कलाकारांना अंतराळात घेऊन जात असल्याचे लिहिलेले पोस्ट माझ्या समोर आले.
  • ही एक अनोखी संधी होती, म्हणून मी त्यांच्या वेबसाइटला भेट दिली आणि अर्ज केला.

देव जोशी पुढे म्हणाला की, “निवड प्रक्रिया खूप मोठी होती. मला शारीरिक चाचण्या, मीटिंग आणि मुलाखती यातून जावे लागले जेथे त्यांना मी चंद्रावर जाण्यासाठी योग्य आहे की नाही हे जाणून घ्यायचे होते. मलाही यासुका मेझावा यांना भेटण्याची संधी मिळाली. जगभरातून सुमारे एक दशलक्ष अर्ज प्राप्त झाले आणि आठ नावे निश्चित होण्यापूर्वी अनेक फेऱ्या पार पडल्या. मी नेहमीच याचे स्वप्न पाहिले आहे आणि आता मी प्रत्यक्षात चंद्रावर जात आहे. मी खूप आनंदी आणि उत्साही आहे.”

अंतराळ आणि कला क्षेत्रात आपल्या देशाचे प्रतिनिधित्व केल्याचा मला अभिमान असेल!

  • देवने म्हटले की, ही अद्भुत बातमी तुमच्यासोबत शेअर करताना मी माझा आनंद व्यक्त करू शकत नाही, पण मी एवढेच सांगेन की ती खूप मोठी असणार आहे.
  • अंतराळ आणि कला क्षेत्रात माझ्या देशाचे एकत्र प्रतिनिधित्व केल्याचा मला अभिमान आहे.

Tags: Actor Dev JoshiBalveergood newsJapan MissionmuktpeethSpace X RocketYasuka Meizawaअभिनेता देव जोशीघडलं-बिघडलंचांगली बातमीजपान मिशनडिअर मून प्रोजेक्टबालवीरमुक्तपीठयासुका मीझावास्पेस एक्स रॉकेट
Previous Post

उच्च न्यायालय : “मुलांना संपत्ती दिली की दिली, पालक ती पुन्हा परत घेऊ शकत नाहीत!”

Next Post

ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धनासाठी जिल्‍हा वार्षिक योजनेत तीन टक्‍के निधी राखीव असणार

Next Post
Conservation of Historical Buildings

ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धनासाठी जिल्‍हा वार्षिक योजनेत तीन टक्‍के निधी राखीव असणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!