मुक्तपीठ टीम
एक काळ होता ज्यावेळी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंतचे बालवीरसाठी वेडे होते. अनेक वर्ष मुलांच्या मनामनात पोहोचलेल्या या काल्पनिक मालिकेला भरभरून प्रतिसाद मिळाला. बालवीर फेम टीव्ही अभिनेता देव जोशीच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. देव जोशी डिअर मून प्रोजेक्टच्या आठ जणांच्या टीमचा भाग आहे. देव पुढच्या वर्षी स्पेस एक्स रॉकेटमधून चंद्राभोवती एक आठवडाभर प्रवास करेल. त्याने याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. तो म्हणाला की, “मी खूप आनंदी आणि उत्साहित आहे.”
देवला कशी मिळाली ही सुवर्णसंधी?
- देव जोशी जपानच्या अब्जाधीश यासुका मीझावा यांच्या या मिशनमध्ये आहे.
- देवने याविषयी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे.
- त्याने दिलेल्या माहितीनुसार, मला नेहमीच अवकाशाबद्दल जाणून घेण्यात रस आहे.
- जेव्हा मी २०२१मध्ये बालवीरसाठी शूटिंग करत होतो, तेव्हा मला एक जपानी अब्जाधीश कलाकारांना अंतराळात घेऊन जात असल्याचे लिहिलेले पोस्ट माझ्या समोर आले.
- ही एक अनोखी संधी होती, म्हणून मी त्यांच्या वेबसाइटला भेट दिली आणि अर्ज केला.
देव जोशी पुढे म्हणाला की, “निवड प्रक्रिया खूप मोठी होती. मला शारीरिक चाचण्या, मीटिंग आणि मुलाखती यातून जावे लागले जेथे त्यांना मी चंद्रावर जाण्यासाठी योग्य आहे की नाही हे जाणून घ्यायचे होते. मलाही यासुका मेझावा यांना भेटण्याची संधी मिळाली. जगभरातून सुमारे एक दशलक्ष अर्ज प्राप्त झाले आणि आठ नावे निश्चित होण्यापूर्वी अनेक फेऱ्या पार पडल्या. मी नेहमीच याचे स्वप्न पाहिले आहे आणि आता मी प्रत्यक्षात चंद्रावर जात आहे. मी खूप आनंदी आणि उत्साही आहे.”
अंतराळ आणि कला क्षेत्रात आपल्या देशाचे प्रतिनिधित्व केल्याचा मला अभिमान असेल!
- देवने म्हटले की, ही अद्भुत बातमी तुमच्यासोबत शेअर करताना मी माझा आनंद व्यक्त करू शकत नाही, पण मी एवढेच सांगेन की ती खूप मोठी असणार आहे.
- अंतराळ आणि कला क्षेत्रात माझ्या देशाचे एकत्र प्रतिनिधित्व केल्याचा मला अभिमान आहे.