Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखाना सुरु करण्यास शासन सकारात्मक – बाळासाहेब पाटील

June 16, 2022
in सरकारी बातम्या
0
शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखाना

मुक्तपीठ टीम

शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखाना लि. शिवाजीनगर दहीवद, ता. शिरपूर जि. धुळे हा कारखाना सरफेसी (सेक्युरायझेशन ॲक्ट) नुसार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ताब्यात घेऊन भाडेतत्वाने सुरु करण्यासाठी शासन सकारात्मक असल्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले. 

शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखाना सुरु करणेबाबत आज सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते.

या बैठकीस साखर आयुक्त शेखर गायकवाड, धुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष राजवर्धन कदमबांडे, शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष माधवराव पाटील, उपाध्यक्ष दिलीप पटेल, जिल्हा बँकेचे संचालक के.डी.पाटील, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी धीरज चौधरी, संघर्ष समितीचे प्रमुख डॉ.जितेंद्र ठाकूर, ॲड.गोपालसिंग राजपूत, मोहन पाटील, कल्पेश जमादार, मिलिंद पाटील, शिरीष पाटील आदी यावेळी उपस्थित होते.

सहकार मंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले, हा कारखाना सुरु करण्यासाठी  बँकेचे व कारखान्याचे संचालक मंडळ सकारात्मक असेल तर शासन सर्व सहकार्य करण्यास तयार आहे. या कारखान्याची काही जमीन ‘ब’ वर्गाची असल्यामुळे कारखाना भाडेतत्वावर देण्यापूर्वी जिल्हाधिकारी यांची संमती घ्यावी लागेल असे कारखान्याच्या पदाधिकाऱ्यांनी नमूद केले. यासंदर्भात साखर आयुक्त यांनी जिल्हाधिकारी धुळे यांच्याशी आवश्यक तो समन्वय करावा असे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी  निर्देश दिले.

साखर आयुक्त श्री. गायकवाड म्हणाले, शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखाना हा केंद्रीय निबंधक यांच्या अखत्यारित येत असला तरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस सरफेसी कायद्यानुसार कारखाना भाडेपट्याने देण्याचा अधिकार आहे. त्यानुसार बँकेने कारखाना भाडेतत्वावर देण्यासाठी सरफेसी कायदयातील तरतुदीनुसार कार्यवाही करण्यास हरकत नाही.


Tags: balasahebh patilShirpur Farmers Cooperative Sugar Factoryबाळासाहेब पाटीलशिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखाना
Previous Post

आता नवीन गॅस कनेक्शन घेणेही झालं महाग! जाणून घ्या किती पैसे लागणार…

Next Post

मंत्रिमंडळ उपसमितीकडून इंदूमिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारक कामाची पाहणी

Next Post
indumill inspection

मंत्रिमंडळ उपसमितीकडून इंदूमिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारक कामाची पाहणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!