Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

लोकनेते बाळासाहेब देसाई अध्यासनाच्या कामांसाठी निधी उपलब्धतेस पाठपुरावा करणार- राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई

October 2, 2022
in घडलं-बिघडलं, सरकारी बातम्या
0
Balasaheb Desai

मुक्तपीठ टीम

शिवाजी विद्यापीठाचे लोकनेते बाळासाहेब देसाई अध्यासनाच्या कामाला गती देण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जातील. अध्यासनाच्या कामांना गती देण्याबरोबरच मंजूर निधी तातडीने उपलब्ध करुन देण्यासाठी प्राधान्य दिले जाईल, अशी ग्वाही राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी आज येथे दिली. शिवाजी विद्यापीठात लोकनेते बाळासाहेब देसाई अध्यासनाच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीत देसाई बोलत होते.

 Balasaheb Desai

देसाई म्हणाले, शिवाजी विद्यापीठ उभारणीमध्ये लोकनेते बाळासाहेब देसाई यांचा सिंहाचा वाटा आहे. प्रतिकूल परिस्थितीतही विद्यापीठ उभारणीमध्ये त्यांनी केलेले काम तसेच कृषि, शिक्षण व ग्रामविकास या क्षेत्रामध्ये त्यांनी केलेले काम आजच्या पिढीसमोर, विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील विद्यार्थ्यांसमोर गेले पाहिजे यासाठी अध्यासनाच्या माध्यामातून प्रयत्न होणे गरजेचे आहे. या कामांसाठी आवश्यक असलेला निधी तसेच अध्यासनाठी शासनाने मंजूर केलेल्या तीन कोटी निधीमधील उर्वरित अडीच कोटीचा निधी तातडीने उपलब्ध व्हावा, यासाठी शासन स्तरावर व्यक्तीश: पुढाकार घेतला जाईल.

मंत्री देसाई म्हणाले, अध्यासनामध्ये त्यांच्या जीवन कार्यावर कार्य कर्तुत्वावर आधारित कला दालन करण्यासाठी आराखडा तयार करावा. या कामासाठी जिल्हा नियोजन मंडळाच्या नाविण्यपूर्ण योजनेतून निधीची तरतूद करण्यात येईल. याबाबतचा प्रस्ताव विद्यापीठाने

जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करावा, अशी सूचना त्यांनी केली. या खेरीज अध्यासनाच्या कामांसाठी उद्योग-व्यवसायांच्या सामाजिक दायित्व निधीमधून निधी उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न केले जातील. अध्यासनाच्या कामाला गती मिळावी यासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि जिल्ह्याचे पालकमंत्री दिपक केसरकर यांच्याशी चर्चा केली जाईल, असेही ते म्हणाले.
प्रारंभी लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या प्रतिमेस पुष्पहार वाहून त्यांनी अभिवादन केले. अध्यासनाचे डॉ. अवनीश पाटील यांनी अध्यासनाविषयी व सुरु असलेल्या कामांविषयी माहिती दिली.

 


Tags: Adhyasan workBalasaheb DesaimuktpeethShivaji UniversityState Excise Minister Shambhuraj Desaiअध्यासन कामघडलं-बिघडलंबाळासाहेब देसाईमुक्तपीठराज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटीलशिवाजी विद्यापीठ
Previous Post

ज्येष्ठ नागरिकांच्या सन्मानजनक आयुष्यासाठी शासन कृतीशील – विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर

Next Post

उत्तरप्रदेशातील काळरात्र : ट्रॉली उलटली, पाण्यात बुडाली, २६ कलेवरंच सापडली!

Next Post
Up GhatamPur Accident

उत्तरप्रदेशातील काळरात्र : ट्रॉली उलटली, पाण्यात बुडाली, २६ कलेवरंच सापडली!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!