Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

बाळासाहेबांचा सेवक चंपा थापाला सोबत घेतल्याचा शिंदे गटाला काय फायदा?

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
bal-thackerays-former-pa-champa-singh-thapa-joined-shinde-camp

मुक्तपीठ टीम

शिवसेनाप्रमुख दिवगंत बाळासाहेब ठाकरे यांचे सेवक चंपा सिंह थापा यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत थापांनी शिंदे गटात प्रवेश केला. चंपा थापा यांच्या सोबतच बाळासाहेब ठाकरेंचे आणखी एक निकटवर्तीय मोरेश्वर राजे यांनीही शिंदे गटात प्रवेश केला. बाळासाहेबांचा सेवक असणाऱ्या चंपा थापा किंवा मोरेश्वर राजे काही राजकीय नेते किंवा पदाधिकारी नसतानाही त्यांना गटात घेऊन त्या घटनेला प्रसिद्धी देण्यामागे एकनाथ शिंदे यांचा काय हेतू असावा, असा प्रश्न चर्चेत आला आहे.

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची सावली समजले जाणारे चंपासिंह थापा व मातोश्रीवर प्रदीर्घ काळ सेवा बजावलेले मोरेश्वर राजे यांनी आज टेंभीनाका येथील जय अंबे धर्मादाय विश्वस्त संस्थेच्या दुर्गेश्वरी मातेच्या आगमन मिरवणुकीत आम्हाला पाठींबा देण्याचा निर्णय जाहीर केला. pic.twitter.com/UT82ppZlMV

— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) September 26, 2022

थापा बाळासाहेबांचे जवळचे सेवक!

  • चंपासिंग थापा ३० वर्षांपूर्वी नेपाळहून भारतात आले. सुरुवातीच्या काळात मुंबईच्या गोरेगावमध्ये राहून पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांनी छोटी-मोठी कामं केली.
  • भांडूपचे नगरसेवक के.टी.थापा यांच्या ओळखीने चंपासिंग थापा यांना मातोश्रीवर प्रवेश मिळाला. त्यानंतर पुढील काही काळातच थापा बाळासाहेबांचे लाडके झाले.
  • थापा बाळासाहेब ठाकरेंचं जेवण, औषधांच्या वेळा यासारख्या रोजच्या गोष्टींवर लक्ष ठेवत.
  • मीनाताई ठाकरे यांच्या निधनानंतर थापांनी बाळासाहेबांची जीवापाड काळजी घेतली.
  • मोरेश्वर राजे हेही बाळासाहेब ठाकरेंसाठी येणारे फोन उचलायचे आणि ज्याने त्यांना फोन केला, त्यांनी त्यांचा निरोप पोहोचवायचे.

चंपा थापा आणि मोरेश्वर राजे हे राजकीय भूमिकेत नसले तरी त्यांचं बाळासाहेबांच्या सहवासात असणं, त्यांचे एकनिष्ठ सेवक ही त्यांची प्रतिमा लक्षात घेतच शिंदेंकडून त्यांना आपल्या गटात घेतलं गेलं असावं. त्याचा थेट राजकीय फायदा नसला, तरी बाळासाहेबांची जवळची माणसंही शिंदे गटाची शिवसेनाच खरी म्हणतात, असं चित्र उभं करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यातून थेट नसला तरी बाळासाहेबांचा वारसा आम्हीच चालवतो, असा संदेश देण्याचा त्यांचा प्रयत्न दिसत आहे.


Tags: Balasaheb thackerayChampa Singh ThapaMoreshwar RajeShinde GroupShivsenaUddhav Thackerayउद्धव ठाकरेचंपा सिंह थापाबाळासाहेब ठाकरेमोरेश्वर राजेशिंदे गटशिवसेना
Previous Post

‘आंदोलनात्मक दहशतवादा’च्या माध्यमांतून राष्ट्राला अधिक हानी पोहोचवणार्‍या पी.एफ.आय. कारवाई आवश्यक! – ब्रिगेडिअर हेमंत महाजन

Next Post

चंद्रकांत पाटील यांच्या कोथरुड मधील विजयावर सर्वोच्च न्यायालयाकडून शिक्कामोर्तब

Next Post
Chandrakant patil

चंद्रकांत पाटील यांच्या कोथरुड मधील विजयावर सर्वोच्च न्यायालयाकडून शिक्कामोर्तब

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!