Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

हमारा ‘बजाज चेतक’ आता ई-स्कुटर! बुकिंग पुन्हा सुरु!

बंपर ऑफरनंतर बुकिंग केलं होतं बंद

September 6, 2026
in लेटेस्ट टेक
0
bajaja

मुक्तपीठ टीम

एकेकाळी भारतीय मनाला गारुड घालणारा स्कूटर ब्रँड म्हणजे बजाज. त्यांची चेतक, प्रिया हे सारेच मॉडेल भन्नाट लोकप्रिय होते. त्यासाठी वेटिंग लिस्ट असे. आता बजाजनं आपला बजाज चेतक नावानं ई-स्कूटर लाँच केली आहे. ती तशीच लोकप्रिय ठरत आहे. पहिला स्लॉट हाऊसफूल्ल झाल्यानंतर आता बजाज ऑटोने त्यांच्या ई-स्कूटर बजाज चेतकसाठी पुन्हा बुकिंग सुरू केली आहे.

 

पुणे आणि बंगळुरू या ठिकाणी बुकिंग सुरू करण्यात आली आहे. यापूर्वी आऊट ऑफ स्टॉक असल्यामुळे या ई-स्कूटरची बुकिंग बंद करण्यात आली होती. येत्या काळात कंपनी २२ शहरांमध्ये त्यांच्या या स्कूटरची विक्री करण्याची योजना आखत आहे. ही ई-स्कूटर नुकतीच नागपूरमध्ये लॉन्च करण्यात आली होती. याशिवाय म्हैसूर, औरंगाबाद आणि मंगळुरुमध्ये देखील स्कूटरची बुकिंग सुरू करण्यात आली होती.

 

चेतक ई-स्कूटरच्या पहिलं बुकिंग हाऊसफुल्ल!

  • बजाज ऑटोने या वर्षी एप्रिल महिन्यात त्यांच्या बजाज चेतक इलेक्ट्रिक स्कूटरची बुकींग सुरू केली होती.
  • तेव्हा केवळ २ दिवसांसाठी बुकिंग सुरू करण्यात आली होती.
  • बजाजने चेतकला १ लाख रुपयांच्या किंमतीत लॉन्च केलं.

 

काय आहेत बजाज चेतकची वैशिष्ट्य?

  • ही इलेक्ट्रिक स्कूटर अर्बन आणि प्रीमियम अशा दोन प्रकारांमध्ये येते.
  • एकदा पूर्ण चार्ज झाल्यावर ही इलेक्ट्रिक स्कूटर ९५ किमी पर्यंतची रेंज देते.
  • पूर्ण सिंगल चार्जवर, ही इलेक्ट्रिक स्कूटर न थांबता ९५ किमीपर्यंत प्रवास करते. तर, इको मोडमध्ये या स्कूटरला केवळ ८५ किलोमीटरची रेंज मिळते.
  • यात जुन्या लूकसह राऊंड डीआरएल देण्यात आलं आहे. तसंच यात सर्व डिजीटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर देण्यात आले आहेत. हे आपण स्मार्टफोनला देखील कनेक्ट करू शकतो.
  • परिणामी, कमी वेळेत ग्राहकांना सर्व माहिती मिळू शकते.

 

बजाज चेतकचं झटपट चार्जिंग!

  • ही इलेक्ट्रीक स्कूटर एका तासात २५ टक्क्यापर्यंत चार्ज होते. तसेच पूर्ण चार्ज होण्यासाठी याला ५ तास लागतात.
  • उत्तम राइडिंग अनुभवासाठी याला सिटी आणि स्पोर्ट असे दोन राईडिंग मोड देण्यात आले आहेत.
  • यात ४.१ किलोवॅट इलेक्ट्रिक मोटर आहे, जी १६ Nm पीक टॉर्क जनरेट करते. याचे इंजिन ऑटोमॅटीक ट्रान्समिशनने सुसज्ज आहे.

Tags: bajajachetak bajajE-scooterचेतक ई-स्कूटरबजाज चेतक
Previous Post

देशी तांदळाच्या निर्यातीत झाली मोठ्याप्रमाणात वाढ!

Next Post

हिंदुस्थान उर्वरक अॅन्ड रसायन लिमिटेडमध्ये ५१३ जागांसाठी भरती

Next Post
hurl

हिंदुस्थान उर्वरक अॅन्ड रसायन लिमिटेडमध्ये ५१३ जागांसाठी भरती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!