Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

चारधामपैकी एक बद्रीनाथ धामचे दरवाजे ८ मे पासून दर्शनासाठी उघडणार!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
Badrinath Mandir

मुक्तपीठ टीम

कोट्यवधी हिंदूंच्या श्रद्धेचे प्रतीक असलेल्या भगवान बद्रीनाथ धामचे दरवाजे ८ मे रोजी सकाळी ६ वाजून १५ मिनिटांनी भाविकांसाठी उघडण्यात येणार आहेत. नरेंद्रनगर येथील दरबारातील राज पुरोहितांनी महाराजा मनुज्येंद्र शाह यांची जन्म पत्रिका पाहिली. त्यानंतर त्यांनी बद्रीनाथ धामचे दरवाजे उघडण्याची तारीख जाहीर केली आहे. त्यामुळे चारधाम यात्रेला दर्शनासाठी जाणाऱ्या हिंदु भाविकांना त्यांची यात्रा ठरवणं शक्य होणार आहे.

 

बद्रीनाथ धामचे कपाट म्हणजे दरवाजे उघडण्याची ठकलेली पद्धत आहे. त्यानुसार राज पुरोहित टिहरी नरेश महाराजा मनुज्येंद्र शाह यांची जन्मपत्रिका तपासतात. त्यातील माहितीच्याआधारे राज पुरोहित बद्रीनाथ धामचे दरवाजे उघडण्याची तारीख ठरवतात. यावेळीही त्याच पद्धतीने दरवाजे उघडण्याची तारीख निश्चित करण्यात आली आहे. आता ठरलेल्या कार्यक्रमानुसार २२ एप्रिल रोजी देवाला महाभिषेकासाठी तिळाचे तेल लावले जाईल.

 

हिवाळा ऋतूमुळे बद्रीनाथ धामचे दरवाजे २० नोव्हेंबरला बंद करण्यात आले होते. तर, केदारनाथ धामचे दरवाजे ६ नोव्हेंबरला बंद करण्यात आले होते. भाऊबीजेच्या निमित्ताने पूजा आणि वैदिक मंत्रोच्चार करून मंदिराचे दरवाजे बंद करण्यात आले होते.

 

भगवान बद्री विशालच्या महाभिषेकासाठी तिहरीच्या खासदार महाराणी माला राज्य लक्ष्मी शाह यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक विवाहित महिला २२ एप्रिल रोजी राजदरबारात तिळाचे तेल काढणार आहेत. त्यानंतर डिमर पंचायतीचे लोक गडू घडा यात्रेला निघतील. यावेळी बद्रीनाथ धामचे रावल ईश्वर प्रसाद नंबूडी, राजेश नंबूदिरी, बद्रीनाथ केदारनाथ मंदिर समितीचे अध्यक्ष अजेंद्र अजय, उपाध्यक्ष किशोर पनवार, सदस्य आशुतोष डिमरी, मुख्य कार्यकारी अधिकारी बीडी सिंग, धर्माधिकारी भुवनचंद्र उनियाल, विशेष कर्तव्य अधिकारी राकेश राकेश, रामेश एस. तिवारी, डॉ.हरीश गौर, प्रमोद नौटियाल, डिमरी धार्मिक मध्यवर्ती पंचायतीचे कार्याध्यक्ष विनोद डिमरी श्रीराम आदी उपस्थित होते.

 

कोरोना काळातही चार लाख भाविक चारधाममध्ये पोहोचले

  • कोरोना काळात चारधाम यात्रा उशिरा सुरू होऊनही उत्तराखंडमध्ये येणाऱ्या यात्रेकरूंची संख्या चार लाखांच्या पुढे गेली आहे. त्यापैकी दोन लाखांहून अधिक भाविक केदारनाथ धाममध्ये पोहोचले आहेत. रविवारी
  • ५,६२४ भाविकांनी श्री बद्रीनाथ धाम, ४९८५ श्री केदारनाथ धाम, १६८ श्री गंगोत्री धाम, ४४० भाविकांनी यमुनोत्री धाममध्ये दर्शन घेतले. एकूण ११,२१७ भाविकांनी दर्शन घेतले.
  • आतापर्यंत चार धामला पोहोचलेल्या यात्रेकरूंची संख्या ४१,४६०७ भाविकांनी भेट दिली आहे.
  • चार धामांचे दरवाजे बंद करण्याची तारीख जाहीर झाल्यानंतर यात्रेकरूंची संख्या सातत्याने वाढत आहे. केदारनाथ धामचे दरवाजे ६ नोव्हेंबरला बंद होणार आहेत.
  • ५ आणि ६ नोव्हेंबरला गंगोत्री आणि यमुनोत्री धामचे दरवाजे बंद करण्यात येणार आहेत.
  • आतापासूनच दरवाजे बंद करण्याची तयारी सुरू झाली आहे. कोरोनामुळे बंद पडलेले चारधाम २०२१ मध्ये सुरू झाल्यानंतर यात्रेकरूंची संख्याही वाढत आहे.

 

यावर्षी यात्रेचे पहिले साडेचार महिने कोरोनामुळे प्रवाशांना धामला जाण्याची परवानगी नव्हती. त्यामुळे आता गेल्या दोन आठवड्यांपासूनची हेलीची तिकिटे सुरू झाली आहेत. जीएमव्हीएनच्या वेबसाइटवरून हेली सेवेची तिकिटे बुक केली जात आहेत.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: Badrinath MandirGood news MorningNarendra Nagarनरेंद्रनगरबद्रीनाथ धाम
Previous Post

आता जमिनींनाही ‘आधार’सारखा ‘युनिक’ नंबर!

Next Post

मुलांच्या भवितव्यासाठी फक्त १० रुपयांमध्ये बँक खाते, मिळवा अनेक फायदे!

Next Post
Mahabank yuva yojana

मुलांच्या भवितव्यासाठी फक्त १० रुपयांमध्ये बँक खाते, मिळवा अनेक फायदे!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!