मुक्तपीठ टीम
कोट्यवधी हिंदूंच्या श्रद्धेचे प्रतीक असलेल्या भगवान बद्रीनाथ धामचे दरवाजे ८ मे रोजी सकाळी ६ वाजून १५ मिनिटांनी भाविकांसाठी उघडण्यात येणार आहेत. नरेंद्रनगर येथील दरबारातील राज पुरोहितांनी महाराजा मनुज्येंद्र शाह यांची जन्म पत्रिका पाहिली. त्यानंतर त्यांनी बद्रीनाथ धामचे दरवाजे उघडण्याची तारीख जाहीर केली आहे. त्यामुळे चारधाम यात्रेला दर्शनासाठी जाणाऱ्या हिंदु भाविकांना त्यांची यात्रा ठरवणं शक्य होणार आहे.
बद्रीनाथ धामचे कपाट म्हणजे दरवाजे उघडण्याची ठकलेली पद्धत आहे. त्यानुसार राज पुरोहित टिहरी नरेश महाराजा मनुज्येंद्र शाह यांची जन्मपत्रिका तपासतात. त्यातील माहितीच्याआधारे राज पुरोहित बद्रीनाथ धामचे दरवाजे उघडण्याची तारीख ठरवतात. यावेळीही त्याच पद्धतीने दरवाजे उघडण्याची तारीख निश्चित करण्यात आली आहे. आता ठरलेल्या कार्यक्रमानुसार २२ एप्रिल रोजी देवाला महाभिषेकासाठी तिळाचे तेल लावले जाईल.
हिवाळा ऋतूमुळे बद्रीनाथ धामचे दरवाजे २० नोव्हेंबरला बंद करण्यात आले होते. तर, केदारनाथ धामचे दरवाजे ६ नोव्हेंबरला बंद करण्यात आले होते. भाऊबीजेच्या निमित्ताने पूजा आणि वैदिक मंत्रोच्चार करून मंदिराचे दरवाजे बंद करण्यात आले होते.
भगवान बद्री विशालच्या महाभिषेकासाठी तिहरीच्या खासदार महाराणी माला राज्य लक्ष्मी शाह यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक विवाहित महिला २२ एप्रिल रोजी राजदरबारात तिळाचे तेल काढणार आहेत. त्यानंतर डिमर पंचायतीचे लोक गडू घडा यात्रेला निघतील. यावेळी बद्रीनाथ धामचे रावल ईश्वर प्रसाद नंबूडी, राजेश नंबूदिरी, बद्रीनाथ केदारनाथ मंदिर समितीचे अध्यक्ष अजेंद्र अजय, उपाध्यक्ष किशोर पनवार, सदस्य आशुतोष डिमरी, मुख्य कार्यकारी अधिकारी बीडी सिंग, धर्माधिकारी भुवनचंद्र उनियाल, विशेष कर्तव्य अधिकारी राकेश राकेश, रामेश एस. तिवारी, डॉ.हरीश गौर, प्रमोद नौटियाल, डिमरी धार्मिक मध्यवर्ती पंचायतीचे कार्याध्यक्ष विनोद डिमरी श्रीराम आदी उपस्थित होते.
कोरोना काळातही चार लाख भाविक चारधाममध्ये पोहोचले
- कोरोना काळात चारधाम यात्रा उशिरा सुरू होऊनही उत्तराखंडमध्ये येणाऱ्या यात्रेकरूंची संख्या चार लाखांच्या पुढे गेली आहे. त्यापैकी दोन लाखांहून अधिक भाविक केदारनाथ धाममध्ये पोहोचले आहेत. रविवारी
- ५,६२४ भाविकांनी श्री बद्रीनाथ धाम, ४९८५ श्री केदारनाथ धाम, १६८ श्री गंगोत्री धाम, ४४० भाविकांनी यमुनोत्री धाममध्ये दर्शन घेतले. एकूण ११,२१७ भाविकांनी दर्शन घेतले.
- आतापर्यंत चार धामला पोहोचलेल्या यात्रेकरूंची संख्या ४१,४६०७ भाविकांनी भेट दिली आहे.
- चार धामांचे दरवाजे बंद करण्याची तारीख जाहीर झाल्यानंतर यात्रेकरूंची संख्या सातत्याने वाढत आहे. केदारनाथ धामचे दरवाजे ६ नोव्हेंबरला बंद होणार आहेत.
- ५ आणि ६ नोव्हेंबरला गंगोत्री आणि यमुनोत्री धामचे दरवाजे बंद करण्यात येणार आहेत.
- आतापासूनच दरवाजे बंद करण्याची तयारी सुरू झाली आहे. कोरोनामुळे बंद पडलेले चारधाम २०२१ मध्ये सुरू झाल्यानंतर यात्रेकरूंची संख्याही वाढत आहे.
यावर्षी यात्रेचे पहिले साडेचार महिने कोरोनामुळे प्रवाशांना धामला जाण्याची परवानगी नव्हती. त्यामुळे आता गेल्या दोन आठवड्यांपासूनची हेलीची तिकिटे सुरू झाली आहेत. जीएमव्हीएनच्या वेबसाइटवरून हेली सेवेची तिकिटे बुक केली जात आहेत.