Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

बाबा रामदेवांनी त्यांच्या शिक्षकाचं बिडीचं व्यसन कसं सोडवलं?

September 6, 2026
in आरोग्य, घडलं-बिघडलं
0
रामदेव

मुक्तपीठ टीम

योग आणि आयुर्वेदासाठी सध्या जगभर ख्यातनाम असणाऱ्या बाबा रामदेवांचा शब्द क्वचितच कुणी टाळत असावं. विशेषत: ते आरोग्यासाठी काही सांगतात तेव्हा लोक ऐकतातच ऐकतात. मग ते नेते असो वा सेलिब्रिटी. बालपणी मात्र त्यांनी हट्ट धरूनही त्यांच्या शिक्षकाने बिडीचे व्यसन सोडले नव्हते. मात्र, बाबा रामदेवही काही कमी नाहीत. त्यांनी मोठे नामांकित झाल्यावरही पाठपुरावा सुरुच ठेवला आणि शिक्षकाची बिडी सोडवली. कशी ते वाचा:

 

रामदेव बाबा मूळचे हरियाणामधील महेंद्रगड जिल्ह्यातील सैद अलीपूर गावचे आहेत. त्यांच्या बालपणीचे नाव रामकिशन होते. त्यांचे शालेय शिक्षण त्याच्या गावातील शाळेतून झाले. ज्या शाळेत ते शिकत होते, तिथे त्यांचे एक शिक्षक खूप बीडी प्यायचे. रामकिशनला ही गोष्ट आवडत नसे. त्यांनी त्या शिक्षकाला बीडीच्या व्यसनातून मुक्त करण्यासाठी इतर सहकारी मित्रांसोबत बरेच प्रयत्न केले. परंतु त्यांना त्यात यश मिळू शकले नाही.

 

बाबा रामदेवांवर ‘एक योगी-योद्धा’ हे पुस्तक लिहिणारे ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक संदीप देव यांनी या शिक्षकाची बिडी बाबा रामदेवांनी कशी सोडवली ते आता उघड केले आहे. जेव्हा रामकिशन हे योगगुरू बाबा रामदेव झाले तेव्हा त्यांनी त्यांच्या व्यासपीठावरुन व्यसनाधीनतेविरोधातही मोहीम सुरु केली. ते उपदेश करताना बर्‍याच वेळा त्या शिक्षकाची कथा लोकांना सांगू लागले.

 

लाजेस्तव शिक्षकाने सोडली बिडी
अखेर एक दिवस त्यांच्याकडे एक पत्र आले. हे पत्र त्याच शिक्षकांचे होते. त्यांनी लिहिले होते, “स्वामीजी, मी तुमचा शिक्षक आहे, ज्याच्या बिडीच्या सवयीमुळे तुम्ही त्रासलेले होता. त्यावेळी तुम्ही माझे बिडी पिण्याचे व्यसन सोडवू शकला नाहीत. परंतु तुम्ही माझे उदाहरण तुमच्या प्रवचनांमध्ये इतक्या वेळा दिले की, मी लाजेने बिडी ओढणे सोडले आहे. आता कधीही बिडीला हात लावणार नाही. कृपया आता माझे उदाहरण देणे थांबवा.”

 

वडिलांचे व्यसन सोडवले
स्वामी रामदेव यांचे वडील रामनिवास यादव हे हुक्का व बिडीही प्यायचे. बालपणी रामदेव यांनी आपल्या वडिलांचीही व्यसनातून मुक्तता केली होती. स्वामी रामदेव यांनी आपल्या वडिलांना स्पष्टपणे सांगितले की, जर त्यांनी बिडी हुक्का सोडला नाही तर ते खाणे पिणे थांबवतील आणि तसेच केले. त्यांच्या वडिलांना कायमचे व्यसन सोडणे भाग पडले.

 

बाबाची भांग विहीरीत !
रामदेवच्या सैद अलीपूर गावात एक बाबा राहत होता आणि तो भांगचा भरपूर सेवन करत होता. त्याने मंदिराच्या अंगणातच भांगची रोपे लावली केली. बाबा रामदेवने त्यांची व्यसनापासून मुक्तता करण्याचा होण्याचा निर्धार केला. त्यासाठी मंदिराच्या अंगणातील सर्व रोपे उपटून विहीरीत टाकली. त्यानंतर त्या बाबांनी मंदिरात कधीही रोप लावली नाहीत.


Tags: Addictionbaba ramdeoDrugsheathmuktpeeth
Previous Post

अखेर योग्य पाऊल! पंतप्रधानांच्या फोननंतर कुंभमेळ्यात गर्दी न करण्याचे आवाहन!

Next Post

नवं संशोधन, नवं टेन्शन! हवेतूनही कोरोना विषाणू पसरत असल्याचा दावा

Next Post
Corona

नवं संशोधन, नवं टेन्शन! हवेतूनही कोरोना विषाणू पसरत असल्याचा दावा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!