मुक्तपीठ टीम
उत्तर प्रदेशमधील समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांची आमदारकी रद्द झाली आहे. द्वेषपूर्ण भाषणामुळे लोकप्रतिनिधी पद गमवणारे ते देशातील पहिलेच नेते ठरले आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रामपूरचे तत्कालीन डीएम जिल्हाधिकारी अंजनेय कुमार सिंह यांच्या विरोधात द्वेषपूर्ण भाषण केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला होता.
द्वेषपूर्ण भाषणा प्रकरणी रामपूर कोर्टाने आझम खान यांना दोषी ठरवले आहे. त्यांना तीन वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. कोर्टाने ३ वर्षांची शिक्षा ठोठावल्याने त्यांना आमदार पद गमवावे लागले आहे. सध्या त्यांच्या एकामागून एक अडचणी वाढत आहे आणि अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत. द्वेषपूर्ण भाषण केल्यामुळे आमदारकी गमावणारे आझम खान हे पहिलेच आहे.
मोदी, डीएम आणि आझम खानांचं कनेक्शन…
- सपा नेते आझम खान यांच्या द्वेषपूर्ण भाषणाचे प्रकरण रामपूरशी संबंधित आहे.
- रामपूरच्या एमपी/ एमएलए न्यायालयाने गेल्या तीन वर्षांत आझम खान यांच्या द्वेषपूर्ण भाषण प्रकरणावर सातत्याने सुनावणी केली.
- हे प्रकरण २०१९च्या लोकसभा निवडणुकीत पीएम मोदी आणि डीएम रामपूर यांच्या विरोधात द्वेषपूर्ण भाषण केले त्या संबंधित आहे.
- आझम खान यांनी ७ एप्रिल २०१९ रोजी पीएम मोदी आणि तत्कालीन डीएम अंजनेय कुमार सिंह यांच्याविरोधात द्वेषपूर्ण भाषण केले होते.
- हेट स्पीच प्रकरणी १५३ए मध्ये किमान ३ वर्षांचा तुरुंगवास आणि दंडाची तरतूद आहे.
- या प्रकरणी आझम खान यांना ३ वर्षांची शिक्षा झाल्याने त्यांना आमदारपद गमवावे लागेल.