Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अविनाश पाटील यांची महाराष्ट्र अंनिसच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल कार्यगौरव समारंभ

July 16, 2022
in घडलं-बिघडलं
0
Avinash Patil was elected as new President of Maharashtra ANNIS

मुक्तपीठ टीम

शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर स्थापित महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अविनाश पाटील यांचा धुळे येथे कार्यगौरव समारंभात सत्कार करण्यात आला. या प्रसंगी सुप्रसिद्ध विधीज्ञ उज्वल निकम, कुलगुरु डॉ. विजयकुमार माहेश्वरी, अँड. एम. एस पाटील, अँड. बाप्पुसाहेब जे.टी. देसले, सत्यशोधक किशोर ढमाले, नाटककार शंभु पाटील, आर्कीटेक्त चेतन सोनार, वासंती दिघे, बी.एस.पाटील, डाँ.संजय पाटील आदी उपस्थित होते.  समविचारी संस्था संघटनांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

Avinash Patil was elected as the President of Maharashtra ANNIS

महाविद्यालयीन जीवनापासून छात्रभारती विद्यार्थी संघटना आणि पुढे अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यातून पुढे आलेले नेतृत्व म्हणजे अविनाश पाटील! यांचा सामाजिक जीवनातील कार्यप्रवास ३७ वर्षांहून अधिक राहिला आहे. त्यातील २६ वर्षे ते पूर्णवेळ कामात आहेत. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या स्थापनेच्या आधीपासून ते या चळवळीत आहेत. सुरुवातीची दोन वर्षे अमळनेर शाखा संघटक, संघटनेच्या नवीन संरचनेत तीन वर्षे जळगाव जिल्हा कार्यवाह, सहा वर्षे राज्य सहकार्यवाह, बारा वर्षे राज्य कार्यवाह होते. दाभोलकर असतानाच २०१० साली त्यांची कार्याध्यक्ष म्हणून निवड झाली आणि पुढे त्यांनी बारा वर्षे राज्य कार्याध्यक्ष पदाची धुरा संभाळली. अशा आपल्या वाटचालीच्या प्रत्येक टप्प्यावर यशस्वीतेची विशेष मोहर उमटवणाऱ्या अविनाश पाटील यांच्याकडे आता राज्य अध्यक्ष पदाची धुरा आली आहे.

“महाराष्ट्र अंनिस संघटनेला अविनाशसारखे समर्थ नेतृत्व आहे”, असे म्हणणाऱ्या भाई एन डी पाटील यांच्याकडे असलेले अध्यक्षपद त्यांच्या निधनानंतर आता अविनाश पाटील यांच्याकडे आले आहे, ते नक्कीच एन डी सरांच्या मनातील संघटनेचा रोड मॅप विस्तारतील, यात शंका नाही. १९८५-८६ पासूनच्या महाविद्यालयीन जीवनात आणि १९९० ते १९९६ या सात वर्षात बांधकाम व्यवसाय करत असतानाही ते सामाजिक कामात सक्रिय होते. पुढे १९९६ पासून ते स्वतःचा चांगला चाललेला व्यवसाय बंद करून पूर्णवेळ महाराष्ट्र अंनिसच्या कामात आले. शालेय महाविद्यालयीन जीवनातील उत्कृष्ट क्रिकेटर, पुढे बांधकाम व्यवसायिक आणि ते सर्व सोडून देऊन पूर्णवेळ सामाजिक कार्यकर्ता हा थक्क करणारा प्रवास आहे. संघटक कार्यकर्ता असलेल्या अविनाश पाटील यांना पुढील कार्यप्रवासासाठी मनःपूर्वक सदिच्छा!


Tags: Avinash PatilMAHAANISNew President OF Maha Anisअविनाश पाटीलमहाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखामहाराष्ट्र अंनिसच्या अध्यक्षपदी
Previous Post

#मुक्तपीठ #LiVE ओबीसी आरक्षण : “भुजबळ, वड्डेटीवार अडीच वर्षे झोपले होते!”

Next Post

#मुक्तपीठ #LiVE संभाजीनगर, धाराशिव, दि. बा. पाटील विमानतळ : ठाकरे सरकारने घेतलेले निर्णय शिंदे सरकारने पुन्हा घेतले!

Next Post
#मुक्तपीठ #LiVE  संभाजीनगर, धाराशिव, दि. बा. पाटील विमानतळ : ठाकरे सरकारने घेतलेले निर्णय शिंदे सरकारने पुन्हा घेतले!

#मुक्तपीठ #LiVE संभाजीनगर, धाराशिव, दि. बा. पाटील विमानतळ : ठाकरे सरकारने घेतलेले निर्णय शिंदे सरकारने पुन्हा घेतले!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!