तिसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी सिडनी कसोटी सामन्यावर ऑस्ट्रेलिया संघाची सामन्यवर पकड पाहायला मिळाली. दुसऱ्या दिवशी पिछाडीवर असणारे कांगारूंनी तिसऱ्या दिवशी जोरदार प्रतिहल्ला करत सामन्यावर वर्चस्व राखले आहे. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या ३३८ धावांचा आवाहनाचा पाठलाग करताना भारतीय संघाचा डाव तिसऱ्या दिवशी २४४ धावांवर आटोपला. त्यानंतर दुसऱ्या डावांत ऑस्ट्रेलियानं दोन गड्यांच्या मोबदल्यात १०३ धावा केल्या आहेत. तिसऱ्या दिवसाखेर कांगारुंने १९७ धावांची आघाडी घेतली आहे.
दुसऱ्या दिवशी पिछाडीवर पडलेल्या ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या दिवशी भारतीय फलंदाजांना एका पाठोपाठ एक माघारी धाडले. त्यानंतर सय्यमी पण आक्रमकपणे फलकावर १०३ धावा उभ्या केल्या. वॉर्नर आणि फुकोव्हकी यांच्या रुपाने ऑस्ट्रलियाला दोन झटके बसले.
Stumps on Day 3 of the 3rd Test.
Australia 338 & 103/2, lead India (244) by 197 runs.
Scorecard – https://t.co/tqS209srjN #AUSvIND pic.twitter.com/QuuisLrasN
— BCCI (@BCCI) January 9, 2021
दरम्यान, आज भारतीय संघाची सुरूवात चांगली झाली नाही. सामन्याची सुरुवात झाल्यानंतर भारतीय कर्णधार अजिंक्य रहाणे लगेच बाद झाला. त्याला २२ धावांवर समाधान मानावे लागले होते. अजिंक्य बाद झाल्यावर फलंदाजीला आलेल्या हनुमा विहारीला फक्त चार धावा करता आल्या आणि तो पुन्हा एकदा अपयशी ठरला. त्यानंतर भारतीय संघाला सावरले ते ऋषभ पंत आणि चेतेश्वर पुजारी या दोघांनी अर्धशतकी खेळी साकारली.
चेतेश्वर पुजारी (५०) आणि शुबमन गिल (५०) यांचा अपवाद वगळता एकाही भारतीय फलंदाजाला मोठी धावसंख्या उभी करता आली नाही. रोहित शर्मा (२६), अजिंक्य रहाणे (२२) आणि ऋषभ पंत (३६) यांना चांगल्या सुरुवातीनंतर मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आलं.
पंत-जडेजाला दुखापत
दरम्यान, पहिल्या डावात फलंदाजी करताना यष्टीरक्षक ऋषभ पंत आणि अष्टपैलू रविंद्र जडेजाला दुखपत झाली आहे. दुसऱ्या डावात क्षेत्ररक्षणासाठी दोघेही मैदानात उतरले नव्हते. जडेजाच्या जागी मयंक अग्रवाल आणि पंतच्या जागी वृद्धीमान साहा क्षेत्ररक्षणासाठी उतरले होते. त्यानंतर पंत-जडेजा यांच्या दुखापतीबाबत समजले. याआधी इशांत, शमी, केएल. राहुल आणि उमेश यादव दुखापतीमुळे कसोटी मालिकेला मुकले आहेत. त्यात या दोघांच्या दुखापतीमुळे भारतीय संघाच्या चिंतेत भर पडली आहे.