Monday, May 12, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home घडलं-बिघडलं

स्टोरीटेलवर “तें – एक श्राव्य अनुभव” हा ऑडिओ नाट्य महोत्सव!

विजय तेंडुलकर यांच्या जन्मदिनानिमित्त आदरांजली उपक्रम स्टोरीटेलवर प्रकाशित

January 7, 2022
in घडलं-बिघडलं, विशेष
0
Audio Drama Festival on Vijay Tendulkar's birthday published on Storytel

मुक्तपीठ टीम

सुप्रसिध्द नाटककार आणि साहित्यिक विजय तेंडुलकर यांचा ६ जानेवारी हा जन्मदिवस. या निमित्ताने स्टोरीटेल ही आंतरराष्ट्रीय ऑडिओ स्ट्रिमिंग कंपनी “तें – एक श्राव्य अनुभव” या नावाने विजय तेंडुलकर ऑडिओ नाट्य महोत्सव स्टोरीटेलवर साजरा करून त्यांना आदरांजली वाहिली आहे. मुंबईतील स्टोरीटेलच्या कार्यालयात मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत या महोत्सवाचे प्रकाशन केल्यानंतर तेंच्या चाहत्यांसाठी स्टोरीटेल ऐकण्यास उपलब्ध करण्यात आले. या सोहळ्यास लोकप्रिय अभिनेते डॉ. मोहन आगाशे, पुष्कर श्रोत्री, संदीप पाठक, पुष्कराज चिरपुटकर, दुष्यंत वाघ, पुष्कराज चिरपुटकर, संगीतकार मिलिंद जोशी, रत्नकांत जगताप, दिग्दर्शक मंगेश कदम, दिग्दर्शिका प्रतिमा कुलकर्णी, स्टोरीटेल (इंडिया) निर्मिती प्रमुख राहूल पाटील, कंटेंट अँड बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर उमेश बर्वे आदि मान्यवर कलावंत उपस्थित होते. संवेदनशील पत्रकार असलेल्या विजय तेंडूलकरांच्या जन्मदिनीच पत्रकार दिवसही असल्याने हा महोत्सव खऱ्या अर्थाने विशेष असल्याचे स्टोरीटेलच्या वतीने प्रसाद मिरासदार यांनी सांगितले.

Audio Drama Festival on Vijay Tendulkar's birthday published on Storytel

स्टोरीटेल आयोजित या उपक्रमाचा भाग म्हणून तयार करण्यात आलेला “वारसा तेंचा” हा प्रतिमा कुलकर्णी दिग्दर्शित लघुपट या वेळी स्टोरीटेलवर प्रदर्शित करण्यात आला. पंचेचाळीस मिनिटांच्या या लघुपटात विजय तेंडुलकर यांच्या नाटकांचे वैशिष्ट्य, आजही नव्या पिढीतील दिग्दर्शकांना त्यांच्या नाटकांबद्दल वाटणारे आकर्षण, स्टोरीटेलवर ऑडिओ रूपात ही नाटके सादर करत असताना आलेले अनुभव तसेच विजय तेंडुलकर यांच्या व्यक्तिमत्वाचा तसेच साहित्याचा समीक्षेच्या अंगाने घेतलेला आढावा असणार आहे. सुप्रसिध्द अभिनेते मोहन आगाशे, संदीप पाठक, दिग्दर्शक विजय केंकरे, प्रतिमा कुलकर्णी, अक्षय शिंपी, समीक्षक रेखा इनामदार साने, राजीव नाईक, राजु परूळेकर आदींनी या लघुपटात सहभाग घेतला आहे.

Audio Drama Festival on Vijay Tendulkar's birthday published on Storytel

याच दिवशी, विजय तेंडुलकर यांच्या अजरामर ठरलेल्या नाटकांपैकीच ‘कावळ्यांची शाळा’, ‘सखाराम बाईंडर’, ‘बेबी’, ‘कन्यादान’ आणि ‘शांतता! कोर्ट चालू आहे!’ या स्टोरीटेलवर सादर होणाऱ्या ऑडिओ नाटकांचे स्टोरीटेल ॲपवर प्रकाशन करून नाट्यरसिकांसाठी अनमोल अशी भेट देण्यात आली आहे.

Audio Drama Festival on Vijay Tendulkar's birthday published on Storytel

स्टोरीटेलवर प्रकाशित झालेल्या या नाटकांपैकी ‘सखाराम बाईंडर’, ‘बेबी’, ‘कन्यादान’ आणि ‘शांतता! कोर्ट चालू आहे!’ या नाटकांचे दिग्दर्शन मंगेश कदम यांनी केले आहे तर ‘कावळ्यांची शाळा’ या नाट्यकृतीचे दिग्दर्शन प्रतिमा कुलकर्णी यांनी केले आहे. तेंडूलकरांच्या या कलाकृतींचे ऑडिओ रूपातील सादरीकरण करतानाचे त्यांना आलेले अनुभव त्यांनी उपस्थितांसोबत कथन केले. मराठी पत्रकार दिनाचे औचित्य साधून यावेळी एनयुजे महाराष्ट्रच्या अध्यक्षा पत्रकार शीतल करदेकर यांचा प्रातिनिधिक सन्मान करून सर्व उपस्थित पत्रकारांचे आभार मानण्यात आले.

Audio Drama Festival on Vijay Tendulkar's birthday published on Storytel

विजय तेंडुलकर ऑडिओ नाट्य महोत्सवातील नाटकांचे अभिवाचन अभिनेते संदीप पाठक, अभिनेत्री  सोनाली कुलकर्णी, चिन्मयी सुमीत, आदिती देशपांडे, आनंद इंगळे, अमिता खोपकर, लीना भागवत, स्पृहा जोशी, अद्वैत दादरकर, मंगेश कदम, सुहास शिरसाट, पुंडलिक धुमाळ, राजन भिसे, पुष्कराज चिरपुटकर, डॉ. शिरीष आठवले, विश्वास जोशी, शैलेश दातार, शर्वरी पाटणकर, दुष्यंत वाघ, अक्षय शिंपी, शिरीष जोशी, संजय देशपांडे, जितेंद्र आगरकर, धनश्री खांडकर, भुषण गमरे, रोहित मोरे, धनश्री करमरकर आदि कलावंतांनी केले आहे. या ऑडिओ नाटकांना संगीत तेजस पडवे, सागर सपकाळे, तसेच तन्मय आणि विनय यांनी दिले आहे तर साऊंड रेकॉर्डिंग योगेश जाधव यांनी तर साऊंड डिजाईन मयूर मोचेमाडकर यांचे आहे. तर संगीत संकल्पना आणि संपूर्ण प्रकल्पाची आखणी व आयोजन स्टोरीटेलचे निर्मिती प्रमुख राहूल पाटील यांचे आहे.

 

‘स्टोरीटेलवर ‘तेंडूलकरांच्या अजरामर नाट्यकलाकृती’ ऐकण्यासाठी स्टोरीटेल सिलेक्टची दरमहा वर्गणी रू. १४९/- तर वार्षिक वर्गणी सवलतीत रू.९९९/- आहे. पण आता नव्याने वार्षिक वर्गणी भरणा-यांसाठी स्टोरीटेलने अधिक सवलत जाहिर केली आहे आणि फक्त रू.३९९/- वार्षिक वर्गणी  भरून कोणत्याही भारतीय भाषेतील हजारो ऑडिओबुक्स सभासद वर्षभर ऐकू शकतात. स्टोरीटेलवर ११ प्रादेशिक भाषांमधील अमर्यादित ऑडिओबुक्सच्या माध्यमातून ‘साहित्यश्रवणानंद’ घेता येईल.

 

तेंडूलकरांच्या या नाट्यकलाकृती स्टोरीटेलवर ऐकण्यासाठील लिंक

https://www.storytel.com/in/en/authors/199859-Vijay-Tendulkar?pageNumber=1

 

तेंडूलकरांच्या या नाट्यकलाकृतीचे प्रोमो पहाण्यासाठी लिंक

https://www.youtube.com/watch?v=9Ng6w_eaCQw

https://www.youtube.com/watch?v=WHt3zYB2fYQ

https://www.youtube.com/watch?v=3gWhmqs5Cr8


Tags: STORYTELvijay tendulkarतें – एक श्राव्य अनुभवविजय तेंडुलकरस्टोरीटेल
Previous Post

कोल्हापुर जिल्हा बँकेत काँग्रेस-राष्ट्रवादी-भाजपा विजयी, शिवसेना-शेकापला तीन जागा!

Next Post

NEET-PG समुपदेशनाला मंजुरी, OBC, EWS कोटा या वर्षी सुरू राहणार! सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे काय घडणार?

Next Post
supreme court 2

NEET-PG समुपदेशनाला मंजुरी, OBC, EWS कोटा या वर्षी सुरू राहणार! सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे काय घडणार?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!