Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

शिंदे-फडणवीसांनी गुजरातची दलाली करून महाराष्ट्राशी गद्दारी करू नये – अतुल लोंढे

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
eknath shinde atul londhe devendra fadnavis

मुक्तपीठ टीम

एकनाथ शिंदे-फडणवीस सरकारने दोन लाख कोटी रुपयांचा फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातच्या घशात घालून महाराष्ट्राशी गद्दारी केली आहे. शिंदे-फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आहेत का मोदी शाह यांचे गुलाम आहेत? असा प्रश्न जनतेला पडला आहे. एक लाख रोजगार देणारा फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रात परत आणला नाही तर बेरोजगार तरुणांसाठी काँग्रेस पक्ष राज्यात मोठे आंदोलन करेल, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी दिला आहे.

गांधी भवन येथे पत्रकारांशी बोलताना अतुल लोंढे पुढे म्हणाले की, फॉक्सकॉनचा प्रकल्प तळेगाव येथे प्रस्तावित होता, तळेगावची जागा रस्ते, पाणी, विमानसेवा, बंदर, हवामान यासह सर्व पायाभूत सोयी असलेली जागा आहे. सेमी कंडक्टर बनवण्यासाठी तळगावचे हवामानही योग्य आहे याउलट गुजरातमधील धोलेरा हे ठिकाण या प्रकल्पासाठी कुठल्याचदृष्टीने योग्य नाही, असे असतानाही हा प्रकल्प तेथे जाऊच कसा शकतो हा महत्वाचा प्रश्न आहे. एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांनी गुजरातची दलाली करून महाराष्ट्राशी केलेली गद्दारी कदापी सहन केली जाणार नाही. मुख्यमंत्री शिंदे स्वतःच मोदी-शाह यांचे एजंट आहेत असे म्हणाले होते म्हणजे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री स्वतः गुजरातचा एजंट होऊन महाराष्ट्राचे प्रकल्प गुजरातला देऊन टाकतो काय?

सरकारमधील लोकांना ५० खोके मिळाल्याची चर्चा आहे, त्यामुळे ते ओके आहेत पण महाराष्ट्रातील तरुणांना रोजगाराची गरज आहे, त्यांना कोणी खोके देणार नाही. बाळासाहेब ठाकरे व आनंद दिघेंचे नाव घेऊन मोदी-शाह यांची गुलामगिरी करायची हे ईडी सरकारचे धोरण दिसत आहे.

महाराष्ट्राला लवकरच दुसरा मोठा प्रकल्प मिळणार आहे असा दावा उद्योगमंत्री करत आहेत पण हे गाजर दाखवण्याचा प्रकार आहे. यात आणखी एक महत्वाची बाब अशी आहे की, २७ जुलै २०२२ रोजी फॉक्सकॉनच्या अधिकारी व शिंदे फडणवीस यांच्या उपस्थितीत एक बैठक झाली त्यावेळी हा प्रकल्प महाराष्ट्रात होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते मग त्यानंतर असे काय घडले की हा प्रकल्प गुजरातला गेला हे महाराष्ट्राच्या जनतेला समजले पाहिजे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री या दोघांचे वॉररूम आहेत पण या दोघांच्या वादात महाराष्ट्राचे नुकसान होत आहे हे दुर्दैवी आहे असेही लोंढे म्हणाले.


Tags: Atul LondhefoxconnFoxconn VedantaGujaratVedantaगुजरातशिंदे-फडणवीस सरकार
Previous Post

शिंदे-फडणवीस यांनी उद्या मुंबई गुजरातला दिली तर आश्चर्य वाटायला नको – नाना पटोले

Next Post

अंगणवाडी सेविकांच्या मानधन वाढीसंदर्भात राज्यशासन सकारात्मक – मंगलप्रभात लोढा

Next Post
एकात्मिक बालविकास सेवा योजनेमधील अंगणवाडी कर्मचा-यांच्या मानधनाबाबत आयोजित बैठक 1

अंगणवाडी सेविकांच्या मानधन वाढीसंदर्भात राज्यशासन सकारात्मक - मंगलप्रभात लोढा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!