Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“शिवसेना संपवण्याच्या राजकारणात, भाजपा बंडखोरांचा वापर करुन त्यांना सोडून देणार” – अतुल लोंढे

July 12, 2022
in घडलं-बिघडलं
0
Atul londhe criticise bjp chandrakant patil

मुक्तपीठ टीम

शिवसेनेच्या आमदार अपात्रतेच्या याचिकेचा निर्णय सुप्रीम कोर्टाने आज खंडपीठाकडे सोपवला असला तरी कायदेशीरबाबींचा विचारविमर्श करता कोर्टाचा निकाल हा सरकारच्या विरोधात जाऊ शकतो. मुळात राज्यातील भाजपा प्रणित सरकार हे असंवैधानिक असून या सरकार स्थापनेसंदर्भात आतापर्यंत घेतलेले सर्व निर्णयही असंवैधानिकच आहेत, असे परखड मत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी मांडले आहे.

यासंदर्भात प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे म्हणाले की, बंडखोर आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय खंडपीठाकडे सोपवण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे दोन तीन गोष्टी स्पष्ट होतील..पहिला म्हणजे विधानसभेच्या उपसभापतींनी जो निर्णय घेतला होता तो योग्य होता का? राजेंद्रसिंह राणा यांच्या प्रकरणात पहिली यादी हीच ग्राह्य धरावी असे न्यायालयाने म्हटले होते त्यामुळे नंतरची सर्वच प्रक्रिया जसे की राज्यपालांनी विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घेणे, राज्यपालांनी विश्वासदर्शक ठरावाला संमती देणे, या सर्व घटना घटनात्मकदृष्ट्या योग्य होत्या की नाही याचा निर्णय लागणार आहे. हा निर्णय विरोधात जाण्याचीच जास्त शक्यता आहे असे घटनातज्ञांचे मत आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या आदेशाने शिवसेनेतील ४० बंडखोर आमदार व भाजपाप्रणित सरकारचे आजचे मरण उद्यावर गेले आहे पण हे सरकार जास्त काळ राहू शकणार नाही. शिवसेना आपल्याच हातात येईल असा भोळ्याभाबड्या शिवसेना आमदारांचा जो समज झाला आहे त्यांनी हे लक्षात घ्यावे की भाजपा त्यांनासुद्धा ‘वापरा व सोडून द्या’ या तत्वानुसार राजकीय उद्येश साध्य होताच त्यांनाही सोडूनच देणार आहे. भाजपाने देशात अघोषीत आणीबाणी लावली असून लोकशाही धोक्यात आली आहे, असेही लोंढे म्हणाले.


Tags: Atul LondheBJPCongressINCShivsenaअतुल लोंढेभाजपाशिवसेना
Previous Post

जीएसटी घोटाळा: १६१ कोटींच्या बनावट बिलाबाबत कंपनीमालकास अटक

Next Post

…तर उद्धव ठाकरे २०१४मध्येच मुख्यमंत्री झाले असते!

Next Post
Prem Shukla Views

…तर उद्धव ठाकरे २०१४मध्येच मुख्यमंत्री झाले असते!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!