Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

‘मी पुन्हा येईन’च्या नादात जनतेचा जीव धोक्यात घालण्याचे काम!- अतुल लोंढे

April 12, 2021
in सरकारी बातम्या
0
atul londhe

मुक्तपीठ टीम

 

कोरोनाने महाराष्ट्रात अभूतपूर्व अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. दररोज हजारो रुग्ण वाढत असताना भारतीय जनता पक्षाकडून राजकारण केले जात आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने भयानक स्थिती उद्भवली आहे. याचा मुकाबला करायचा असेल तर लॉकडाऊन व लसीकरण हाच पर्याय आहे. मात्र लसी उपलब्ध नाहीत आणि ‘उत्सव’ची इव्हेंटबाजी भाजपा करत आहे. हा प्रकार मढ्यावरचे लोणी खाण्याचा असून केवळ ‘मी पुन्हा येईन’च्या चक्करमध्ये महाराष्ट्राच्या जनतेचा जीव धोक्यात घालण्याचे पातक महाराष्ट्रद्रोही भाजपा करत आहे, असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे.

 

यासंदर्भात बोलताना लोंढे म्हणाले की, नागपूरमध्येही कोरोनाने थैमान घातले असताना महानगरपालिकेचा बेजबाबदारपणा व भाजपाच्या नेत्यांचा खोटारडेपणा सुरू आहे. महानगरपालिकेतील लसींचा साठा आज संपत आहे उद्यापासून लस मिळाली नाही तर मृत्यूंचं तांडव उभं राहण्याची भिती असताना केवळ क्रेडिट घेण्यासाठी इव्हेंटबाजी करत जनतेच्या जीवांशी खेळ चालवला आहे. लसच नाही तर उत्सव कसला करता. हा उत्सव नसून युद्ध आहे आणि युद्धात तत्पर रहायला हवे ती तत्परता दिसत नाही.

महापौर दयाशंकर तिवारी हे ५०० बेड्सचे रुग्णालयात उभे करण्याचे सांगत आहेत परंतु सध्या २५० बेड्स उपलब्ध आहेत त्यासाठीच मनुष्यबळ नाही तर नवीन रुग्णालयाचे खोटे आश्वासन का देता. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही ५००० रेमडेसीवीर इंजेक्शन उपलब्ध आहेत असे जाहीर करुन त्यासाठी एक नंबरही देण्यात आला होता पण त्यावर चौकशी केली असता तेही खोटे निघाले. अशा पद्धतीने खोटे बोलून जनतेची दिशाभूल करण्याचे काम भाजपाकडून केले जात आहे.

कोरोनाच्या या गंभीर संकटात राजकारण विसरून सर्वांनी एकत्र येऊन याचा सामना केला पाहिजे. राज्य सरकार त्यांच्या परीने योग्य काम करत आहे. देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी, पियुष गोयल, प्रकाश जावडेकर यांनीही महाराष्ट्रासाठी केंद्र सरकारकडून मोठी मदत आणली पाहिजे. मात्र भाजपाला या महामारीच्या संकटातही आपली राजकीय पोळी भाजायची आहे. भाजपाला केवळ विरोधासाठी विरोध आणि फक्त राजकारण करायचे आहे अशी टीका लोंढे यांनी केली आहे.

 


Tags: Atul LondheBJPCongressअतुल लोंढेदेवेंद्र फडणवीसनितीन गडकरीपियुष गोयलप्रकाश जावडेकर
Previous Post

“शासकीय वसुली थांबवण्यासाठी कोळी समाजाने वंचितच्या उमेदवाराला निवडून द्यावे” – ॲड. प्रकाश आंबेडकर

Next Post

गरिबांना मोफत रेशनसाठी ”मुख्यमंत्री गरीब कल्याण अन्न योजना” सुरू करण्याचा प्रस्ताव

Next Post
gorhe nd bujbal

गरिबांना मोफत रेशनसाठी ''मुख्यमंत्री गरीब कल्याण अन्न योजना" सुरू करण्याचा प्रस्ताव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!