Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

‘स्किन टू स्किन’ स्पर्श प्रकरणातील निकालाला आक्षेप! सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे लक्ष

मुंबई उच्च न्यायालयाच्या 'त्या' निकालावर अॅटर्नी जनरल वेणुगोपालांनी नोंदवले आक्षेप

September 6, 2026
in कायदा-पोलीस, घडलं-बिघडलं
0
HC-SC

मुक्तपीठ टीम

मुलीच्या शरीराला थेट स्पर्श नसेल तर तो रोत्सोखाली गुन्हा नाही, असा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर वाद निर्माण झाला होता. त्या निकालाविरोधात अपिलावर सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णय रोखून ठेवला आहे. उच्च न्यायालयाने गुन्हा नाही असा निकाल देताना पोक्सोतील काही तरतुदींकडे लक्ष देण्यात आलं नसल्याचा आक्षेप अॅटर्नी जनरल वेणुगोपाल यांनी नोंदवला आहे. त्यामुळे आता सर्वांचं लक्ष सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निकालाकडे लागले आहे.

 

न्यायमूर्ती यू यू ललित यांच्या खंडपीठाने दोन्ही बाजूंच्या वकिलांचे युक्तिवाद ऐकले आणि त्यांना त्यांचे युक्तिवाद लेखी स्वरूपात दाखल करण्यास सांगितले.

 

नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण?

  • सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या वादग्रस्त निकालातील एका आरोपीच्या पोक्सोमधील मुक्ततेविरोधात आव्हान याचिकेवर सुनावणी सुरू केली.
  • उच्च न्यायालयाने आपल्या आदेशात असे म्हटले होते की, ‘शरीराला थेट स्पर्श झाला नसेल तर तो गुन्हा आयपीसीच्या कलम ३५४ अंतर्गत विनयभंग आहे परंतु पोक्सोच्या कलम ८ अंतर्गत ‘लैंगिक अत्याचाराचा गंभीर गुन्हा नाही.
  • न्यायमूर्ती यूयू ललित, न्यायमूर्ती रवींद्र भट आणि बेला त्रिवेदी यांच्या तीन सदस्यीय खंडपीठाने मुंबई उच्च न्यायालयच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या वादग्रस्त निर्णयाविरोधात अटर्नी जनरल के के वेणुगोपाल यांनी दाखल केलेल्या विशेष अनुमती याचिकेसह (एसएलपी) अनेक याचिकांवर तपशीलवार सुनावणी सुरू केली होती.

 

अॅटर्नी जनरल वेणुगोपाल यांनी कोणते नोंदवले आक्षेप?

  • अॅटर्नी जनरल वेणुगोपाल यांनी आपल्या याचिकेत म्हटले आहे की, उच्च न्यायालयाच्या वादग्रस्त निर्णयामुळे पॉक्सो कायद्याच्या कलम ७ चा चुकीचा अर्थ लावला गेला आहे.
  • त्यांच्या मते, मुलीच्या शरीराला स्पर्श करण्याच्या गुन्ह्यासाठी तीन वर्षे शिक्षा न्यायाधीशांना जास्त कठोर वाटली असेल, पण त्याचवेळी अशा प्रकारच्या सर्व कृत्यांना व्यापक स्तरावर हाताळणाऱ्या कलम सातकडे लक्ष दिले नाही.
  • त्यानुसार अशा प्रकारच्या गुन्ह्यांसाठी किमान शिक्षा ही तीन वर्षांचीच ठरवण्यात आली आहे.

 

भादंवि ३५४ आणि पोक्सोमधील फरक

  • अॅटर्नी जनरल वेणुगोपाल म्हणाले की, भादंविचे कलम ३५४ महिलेंशी संबंधित आहे ना की १२ वर्षांच्या मुलीशी.
  • पोस्को हा एक विशेष कायदा आहे जो अधिक असुरक्षित असलेल्या मुलांचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने आहे.
  • अशा परिस्थितीत, कोणीही असे म्हणू शकत नाही की आयपीसीचे कलम ३५४ समान आहे.

Tags: Mumbai HCskin to skinअॅटर्नी जनरल वेणुगोपालआयपीसीपोस्कोमुंबई उच्च न्यायालयसर्वोच्च न्यायालयस्किन टू स्किन
Previous Post

हवेची गुणवत्ता मांडणाऱ्या भारतीय बनावटीच्या सफर मॉडेलला जागतिक स्तरावर मान्यता

Next Post

विनोदवीर दादा कोंडके: गिरणगावातील चाळसंस्कृतीत बहरलेला कलाक्षेत्रातील बहुपैलू ‘दादा’

Next Post
chalitale tower

विनोदवीर दादा कोंडके: गिरणगावातील चाळसंस्कृतीत बहरलेला कलाक्षेत्रातील बहुपैलू 'दादा'

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!