मुक्तपीठ टीम
असूसने नवीन फोल्डेबल लॅपटॉप Zenbook 17 Fold OLED भारतात लाँच केला आहे. हा जगातील पहिला लॅपटॉप आहे जो १७.३ इंच डिस्प्ले सह येतो. फोल्डेकेल्यावर त्याचा स्क्रीनचा आकार १२.५ इंच होतो. या लॅपटॉपमध्ये फक्त फोल्डेबल डिस्प्लेच नाही तर अनेक अॅडव्हान्स फीचर्सही उपलब्ध आहेत. या लॅपटॉपसोबत Asus ErgoSense ब्लूटूथ कीबोर्डही उपलब्ध असेल. कंपनीचा दावा आहे की Zenbook 17 Fold OLED ची तीस हजार वेळा उघडणून आणि बंद करून चाचणी केली गेली आहे. चला जाणून घेऊया त्याची किंमत आणि फीचर्स…
असूस Zenbook 17 Fold OLED फिचर्स…
- या असूस लॅपटॉपमध्ये १७.३ इंचाचा डिस्प्ले आहे.
- फोल्ड केल्यानंतर डिस्प्ले १२.५ इंच होतो.
- १७.३ इंच डिस्प्लेचे रिझोल्यूशन २५६० x १९२० पिक्सेल आहे.
- फोल्ड केल्यानंतर, डिस्प्लेचे रिझोल्यूशन १९२० x १२८० पिक्सेल होते.
- या लॅपटॉपमध्ये जास्तीत जास्त ५००नीट्स ब्राइटनेस मिळेल.
- या लॅपटॉपमध्ये टच स्क्रीन सपोर्ट आणि अँटी फिंगरप्रिंट कोटिंग देखील मिळते.
- हा लॅपटॉप १२व्या जनरल इंटेल कोर i7 प्रोसेसरसह येतो.
- यात १६जीबी DDR5 रॅम आणि 1TB SSD स्टोरेज आहे.
- या लॅपटॉपमध्ये 75WHr बॅटरी आहे, जी ६५ वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
- या लॅपटॉपमध्ये २ थंडरबोल्ड ४ पोर्ट आणि ३.५ मिमी हेडफोन कॉम्बो ऑडिओ जॅक आहे.
- यात 5MP AI कॅमेरा आहे.
- यात चार स्पीकर आहेत.
- यात बिल्ट-इन मायक्रोफोन आहे, जे अलेक्सा व्हॉईस असिस्टंटला सपोर्ट करतो.
- या लॅपटॉपचे वजन फक्त १.५ किलो आहे आणि कीबोर्डसह त्याचे एकूण वजन १.८ किलो होते.
- असूस Zenbook 17 Fold OLED याची किंमत भारतीय बाजारात ३,२९,९९० रुपये आहे.
- हा लॅपटॉप असूस ई- शॉप, ऍमेझॉन, फ्लिपकार्ट, क्रोमा, रिलायन्स डिजिटल, विजय सेल्स, आणि असूस एक्सक्लूसीव्ह स्टोअर्स आणि आर ओ जी स्टोअर्ससह सर्व ऑफलाइन आणि ऑनलाइन स्टोअरमध्ये उपलब्ध आहे.