मुक्तपीठ टीम
आसूसने आपला बजेट क्रोमबुक लॅपटॉप भारतीय बाजारात लॉंच केला आहे. त्याचा मॉडेल क्रमांक CX1101 असा आहे. या क्रोमबुकमध्ये ११.६ इंचाचा अँटी-ग्लेअर एचडी डिस्प्ले आहे. या रग्ड डिझाइनसाठी MIL-STD 810H प्रमाणपत्र देखील मिळाले आहे. लॅपटॉपमध्ये ४जीबी रॅम आणि ६४जीबी eMMC स्टोरेजसह जोडलेल्या ड्युअल-कोर इंटेल सेलेरोन N4020 प्रोसेसरची क्षमता आहे.
आसुसचा क्रोमबुकविषयीच्या विक्री-खरेदीची सविस्तर माहिती
- या क्रोमबुकची सुरुवातीची किंमत १९ हजार ९९९ रुपये आहे.
- त्याची विक्री १५ डिसेंबरपासून फ्लिपकार्टवर सुरू होईल.
- लॉंचिंग ऑफरचा भाग म्हणून १५ ते २१ डिसेंबर दरम्यान हे क्रोमबुक खरेदी करणाऱ्या ग्राहकांना कंपनी १ हजार ९ रूपयांची सूट देईल.
- या ऑफरमुळे ग्राहकांना क्रोमबुक फक्त १८ हजार ९९० रुपयांना खरेदी करता येईल.
आसुस क्रोमबुक CX1101चे स्पेसिफिकेशन
- या क्रोमबुकमध्ये ११.६ इंचाचा अँटी-ग्लेअर एचडी एलसीडी डिस्प्ले आहे.
- यात ड्युअल-कोर इंटेल सेलेरॉन N4020 प्रोसेसर, ४जीबी LPDDR4 रॅम आणि ६४जीबी eMMC स्टोरेज आहे.
- ते गुगलच्या क्रोम ऑपरेटिंग सिस्टमवर चालेल.
- क्रोमबुकला रग्ड डिझाईन देण्यात आले आहे, त्यासाठी यात धातूचा वापर करण्यात आला आहे.
- स्क्रीनचे लीड १८०-डिग्री पर्यंत फिरवले जाऊ शकते.
- क्रोमबुकमध्ये ३-सेल ४२Whr बॅटरी आहे.
- एका चार्जवर १३ तासांचा बॅकअप घेता येईल असे कंपनीचे म्हणणे आहे.
- हे ४५डब्ल्यू यूएसबी-टाईप सी चार्जिंगला सपोर्ट करते.
- कनेक्टिव्हिटीसाठी, यात दोन यूअसबी ३.२ टाईप-सी पोर्ट, दोन यूएसबी ३.२ टाईप-ए पोर्ट, मायक्रो एसडी कार्ड रीडर, ३.५ एमएम ऑडिओ जॅक आहेत.
- लॅपटॉपचे डायमेंशन २९१.६x२००.९x१९.५एमएम आणि वजन १.२४ किलो आहे.
पाहा व्हिडीओ: