मुक्तपीठ टीम
जगातील सात आश्चर्यांपैकी एक असणाऱ्या ताजमहालाच्या २२ बंद खोल्यांचा वाद सुरु आहे. दरम्यान या २२ बंद खोल्यांचे फोटो आता समोर आले आहेत. भारतीय पुरातत्व विभागाने (एएसआय) ताजमहालच्या त्या २२ बंद खोल्यांचे फोटो शेअर केले आहेत. २०२२ मध्ये खोल्यांची डागडुजी करताना हे फोटो काढण्यात आले होते. आग्रा एएसआय प्रमुख आरके पटेल यांच्या मते, फोटो एएसआय वेबसाइटवर जानेवारी २०२२ च्या न्यूजलेटरच्या स्वरूपात देखील उपलब्ध आहेत, हे फोटो पाहण्यासाठी कोणीही त्यांच्या वेबसाइटला भेट देऊ शकते.
एएसआय वेबसाइटवर सर्वांसाठी फोटो उपलब्ध!
- अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठाने अलीकडेच या २२ खोल्या उघडण्यासाठी डॉ. रजनीश कुमार यांनी दाखल केलेली जनहित याचिका फेटाळून लावली होती.
- यानंतर एएसआयने हे फोटो शेअर केले आहेत.
- या बंद खोल्यांमध्ये प्लास्टर, चुन्याचे पॅनिंगसह नूतनीकरणाचे काम करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
- जवळपास सहा लाखांचा खर्च करण्यात आला आहे.
- त्याच वेळी, अधिकाऱ्यांनी सांगितले होते की आतापर्यंतच्या विविध नोंदी आणि अहवालांमध्ये कोणत्याही (हिंदू) मूर्तीचे अस्तित्व दिसून आलेले नाही.
- अधीक्षक पुरातत्वशास्त्रज्ञ (आग्रा सर्कल) राज कुमार पटेल म्हणाले की, अधिकाऱ्यांनी केलेल्या जीर्णोद्धाराच्या कामाचे फोटो आता एएसाआय वेबसाइटवर सर्वांसाठी उपलब्ध आहेत.
न्यायालयाने फेटाळली याचिका!
- अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठात भाजपाचे प्रवक्ते रजनीश सिंह यांनी ताजमहालमध्ये असलेल्या २२ खोल्या उघडण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी करणारी याचिका दाखल केली होती.
- मात्र, कोर्टाने ही याचिका फेटाळली होती.
- २२ खोल्या उघडण्यासाठी व सत्य शोधण्यासाठी तुम्ही एका समितीची नेमणूक करण्याची मागणी करत आहात.
- अशी मागणी करणारे तुम्ही कोण? हा तुमचा अधिकार नाही.
- तु्म्हाला उत्तर हवे असेल तर तुम्ही माहिती आधिकारातून जाणून घेऊ शकता.