Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

नातीच्या स्वागतासाठी आजोबांचा उत्साह, हेलिकॉप्टर भरारीसह सेलिब्रिटी!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
Ashok Jadhav welcomes granddaughter by helicopter

रॉबिन डेव्हिडसन

लेक म्हणजे नकुशी. चक्क तेच नाव लेकीला देणारेही महाभाग आहेत. मात्र, त्याचवेळी सांगलीच्या कडेगाव तालुक्यातील हिंगणगाव खुर्दमधील एका आजोबांनी आपल्या नातीच्या आगमनाचा अतिभव्य सोहळा साजरा केला. तिला पुण्याहून हेलिकॉप्टरनं गावात आणलं. तेवढंच नाही तर स्वागतासाठी ‘चला हवा येवू द्या’ या धमाल कार्यक्रमातील सेलिब्रिटी कलाकार हजर होते. एकूणच बेटी म्हणजे धनाची पेटी ही भावना आजही कायम असल्याचे आजोबा अशोक जाधव यांनी दाखवून दिले.
अशोक जाधव हे हिंगणागावचे सरपंचही आहेत. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून त्यांना “मुलगी जपावी, ती मोठी व्हावी आणि समाजाला आदर्श बनावी” हा संदेश द्यायचा होता. त्यांनी आपल्या नातीचे स्वागत चक्क हेलिकॉप्टरने केलं. पुणे ते हिंगणगाव खुर्द असा त्यांनी आपल्या नातीला हेलिकॉप्टर प्रवास घडवला. नातीच्या स्वागत सोहळ्यास गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी ‘चला हवा येवू द्या’ कार्यक्रमातील प्रख्यात सेलिब्रिटी कलाकारही याठिकाणी उपस्थित होते. अशोक जाधव यांनी आपल्या एकुलत्या एक नातीवर प्रेम करुन महिलांविषयी कसा आदर बाळगावा हे या कार्यक्रमातून दाखवून दिले, अशी गावकऱ्यांमध्ये चर्चा आहे.

 

कडेगाव तालुक्यातील हिंगणगाव खुर्द येथील सरपंच अशोक जाधव यांच्या एकुलत्या एक कन्या स्नेहा यांना कन्यारत्न झाले. या चिमुकल्या नातीला त्यांनी पुण्याहून चक्क हेलिकॉप्टरने आजोळी घरी आणलं आणि मुलीच्या जन्माचं स्वागत भव्य आणि अनोख्या पद्धतीने केलं.

 

असा झाला नातीच्या आगमनाचा दिमाखदार सोहळा…

  • शनिवारी दुपारी चारच्या सुमारास सांगलीतील वांगी क्रीडा संकुलाच्या मैदानात हेलिकॉप्टर उतरले.
  • सरपंच अशोक जाधव यांच्यासह कुटुंबीयांनी घरातील नव्या लक्ष्मीचं झोकात स्वागत केलं.
  • कन्याजन्माचा आनंदही मोठ्या दिमाखात साजरा केला.
  • अशोक जाधव यांना स्नेहा ही एकच मुलगी आहे.
  • या मुलीचा विवाह २७ नोव्हेंबर २०२० रोजी कुंडल येथील दिग्विजय लाड यांच्याशी झाला.
  • स्नेहा आणि दिग्विजय यांच्या संसरात २९ मार्च २०२२ रोजी लेकीचं आगमन झालं.
  • अशोक जाधव आणि त्यांच्या पत्नी उषा या आजी-आजोबांनी आपल्या नातीचे भव्य स्वागत करायचे ठरवले.
  • आई आणि मुलगी ‘हेलिकॉप्टर’मधून उतरले त्यावेळी त्यांचे पुष्पहार आणि हार घालून स्वागत करण्यात आले.
  • नातीला हेलिकॉप्टरमधून खाली घेताच आजोबांनी तिला कवटाळून आनंद साजरा केला.
  • बँड आणि झांज पथकाच्या निनादात भव्य मिरवणूकही काढण्यात आली.
  • अशोक जाधव यांनी नातीच्या स्वागतासाठी गावातील रस्त्यांवर स्वागत कमानी उभारून फुलांची उधळण केली.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: Ashok JadhavcelebrityGood news MorningHelicopterHingan gaonअशोक जाधवचांगली बातमीसेलिब्रिटीहिंगणागावहेलिकॉप्टर
Previous Post

बिरोबाच्या नावानं चांगभलं…एकच गजर आसमंतात! यात्रेला प्रचंड प्रतिसाद!

Next Post

पालघर जगभरातील पक्षांचं केंद्र, रेड नेक फॅलेरॉपसह ३८० देशी-विदेशी पक्षी!

Next Post
Along with red neck fallop 380 more birds in Palghar district

पालघर जगभरातील पक्षांचं केंद्र, रेड नेक फॅलेरॉपसह ३८० देशी-विदेशी पक्षी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!