Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवणाऱ्या भागात ‘पूल-वजा-बंधारे’ तंत्रज्ञानाचा वापर करा”: अशोक चव्हाण

‘पूल-वजा-बंधाऱ्याचे संकल्पचित्र आणि मार्गदर्शक तत्त्वे’ या पुस्तकाचे प्रकाशन

September 30, 2021
in घडलं-बिघडलं, सरकारी बातम्या
0
Ashok Chauhan

मुक्तपीठ टीम

राज्याच्या ज्या भागात पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवते त्या भागात पूल-वजा-बंधारे करण्याच्या नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे आवाहन करतानाच कमी खर्चात शेतीसाठी आणि पिण्यासाठी पाणी उपलब्ध होणाऱ्या या तंत्रज्ञानाची माहिती सर्व जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी दिले.

 

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संकल्पचित्र मंडळातर्फे तयार करण्यात आलेल्या ‘पूल-वजा-बंधाऱ्याचे संकल्पचित्र आणि मार्गदर्शक तत्त्वे’ या पुस्तकाचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. मंत्रालयात आयोजित या कार्यक्रमास सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव उल्हास देबडवार यांचेसह तज्ज्ञ समितीचे निवृत्त प्रधान सचिव प्रमोद बोंगिरवार, निवृत्त सचिव (रस्ते) कृष्णा जांगडे, राष्ट्रीय महामार्ग मंडळाचे अधीक्षक अभियंता मनोज जयस्वाल, नागपूरच्या व्हीएनआयटी कॉलेजचे प्रा. डॉ. रमाकांत इंगळे, नागपूरच्या इनोव्हेटिव्ह कन्स्ट्रक्शनचे संचालक गरीबदास आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

 

सिमेंट प्लग बंधाऱ्यासाठी जितका खर्च येतो त्याच्या निम्म्या किंमतीत पूल-वजा-बंधाऱ्याची निर्मिती होते. जुन्या पूलांवरही हे बंधारे बांधता येतील असे हे तंत्रज्ञान असून पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवणाऱ्या भागासाठी हे पूल-वजा-बंधारे वरदान ठरतील, असा विश्वास सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केला.

Ashok Chauhan

राज्यात प्रायोगिक तत्वावर १६ ठिकाणी हे पूल-वजा-बंधारे बांधण्यात आले असून टंचाईवर होणारा खर्च पाहता हे नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरल्यास त्याचा निश्चित लाभ होईल, त्याकरिता सर्व जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना हे तंत्रज्ञान वापरण्याच्या सूचनाही यावेळी चव्हाण यांनी दिल्या. नांदेड जिल्ह्यातील भोकर, मुदखेड आदी ठिकाणी अशा प्रकारचे बंधारे किती ठिकाणी घेता येतील याविषयी चाचपणी करण्याचे निर्देशही चव्हाण यांनी यावेळी दिले.

 

पूल-वजा-बंधारा बांधण्यासाठी केंद्राकडून मिळणाऱ्या आर्थिक सहाय्याचा लाभ घेण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना देतानाच नाबार्डच्या स्वतंत्र प्रस्तावात या तंत्रज्ञानाचा समावेश करण्याच्या सूचनाही सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी यावेळी दिल्या.

 

काय आहे ‘पूल-वजा-बंधारे’ तंत्रज्ञान?

पूलाचे रुपांतर पूल-वजा-बंधाऱ्यात कसे करायचे याविषयीची सविस्तर माहिती ‘पूल-वजा-बंधाऱ्याचे संकल्पचित्र आणि मार्गदर्शक तत्त्वे’ या पुस्तकात देण्यात आली आहे. या पूल-वजा-बंधाऱ्यांचा खर्च सिमेंट बंधाऱ्याच्या तुलनेत ५० ते ६० टक्के इतकाच येतो तसेच पाण्याचा साठा करण्यासाठी शासनाने ठरविलेल्या मानकाच्या तुलनेत ६० ते ७० टक्के इतकाच खर्च येत असल्यामुळे हे एक नावीन्यपूर्ण आणि किफायतशीर असे तंत्रज्ञान आहे. हे बांधकामाचे तंत्रज्ञान विकसित केल्यामुळे स्थानिक साधने आणि कुशल कामगारांच्या मदतीने हे काम पूर्ण करता येऊ शकते.

 

गावाजवळील नाल्यांचा उतार जास्त असल्यामुळे पाऊस थांबल्यावर पाणी पूर्णपणे ओसरुन जाते त्यामुळे विहिरींमध्ये पाणी पातळी वाढण्यास विशेष मदत होत नाही मात्र, त्या गावाजवळील पूलाचे रुपांतर हे तंत्रज्ञान वापरून बंधाऱ्यात केल्यास प्रत्येक गाव पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्यासाठी स्वयंपूर्ण करता येणे शक्य आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे.

 

पूल-वजा-बंधारे तंत्रज्ञानाचे संकल्पचित्र विकसित करण्यासाठी व त्याच्या अभ्यासासाठी पुणे, अमरावती येथील अभियांत्रिकी महाविद्यालये, चंद्रभागा नदीचे कालवे येथे अभ्यास करून संकल्पचित्र विकसित करण्यात आले आहे. शेगावजवळील कतरगाव येथे या तंत्रज्ञानाचा वापर करून २४ लाख रुपये खर्चून बंधारा बांधल्याने परिसरातील विहीरींची पाणी पातळी ९० फुटांवरुन ७० फुटांवर आली आहे. अकोला जिल्ह्यातील अपोती गावामध्येदेखील या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.


Tags: ‘पूल-वजा-बंधारे’ तंत्रज्ञानAshok Chavanमंत्री अशोक चव्हाण
Previous Post

‘आधार’ झाले अकरा वर्षांचं…देशात पहिलं ओळखपत्र दिलं ते ‘आधार गाव’ महाराष्ट्रातील!

Next Post

“मुंबईत उभे राहणार लष्करी संग्रहालय”

Next Post
Maha CM

"मुंबईत उभे राहणार लष्करी संग्रहालय"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!