मुक्तपीठ टीम
बुधवारी सकाळी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांवर अनेक गंभीर आरोप केले. मलिकांच्या आरोपानंतर आशिष शेलारांनी पत्रकार परिषद घेत त्यांना प्रत्युत्तर दिलं. हायड्रोजन बॉम्बची भाषा करणारे सकाळी लवंगीसुद्धा लावू शकले नाहीत. त्यांनी लवंगी लावण्याचा प्रयत्न केला त्यातही हात पोळले, अशी टीका आशिष शेलारांनी मलिकांवर केली. शेलार तेवढ्यावरच थांबले नाहीत, त्यांनी डी कंपनीच्या रियाझ भाटीचे पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमातील फोटोबद्दलच्या मलिकांच्या आरोपांना उत्तर देताना भाटीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबतचे फोटोही दाखवले. एवढेच नव्हे तर शिवसेनेने आता तरी आपल्या या आघाडीतील मित्रांविषयी विचार करावा, असेही ते म्हणाले.
हायड्रोजन सोडा लवंगीही नाही!
- हायड्रोजन बॉम्बची भाषा करणारे सकाळी लवंगीसुद्धा लावू शकले नाहीत.
- त्यांनी लवंगी लावण्याचा प्रयत्न केला त्यातही हात पोळले.
- नवाब मलिक यांची हतबलता आणि घालमेल इतकी होती की हायड्रोजन सोडा त्यांना ऑक्सिजनची गरज लागेल की काय अशी अवस्था झाली आहे.
मलिकांचे आरोप बिरबलाच्या खिचडीसारखे!
- हाजी हैदर, हाजी अराफतचा भाऊ, रियाझ भाटी, समीर वानखेडे, वसुली, आंतरराष्ट्रीय फोन अशी नावं आणि असे शब्द आणून त्यांनी खूप मोठं चित्रं निर्माण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला.
- पण तो अयशस्वी ठरला.
- या सर्व प्रकरणाशी फडणवीसांशी संबंध जोडणं म्हणजे बिरबलाने जमिनीवर कोळसा ठेवून ऊंचावर ठेवलेली बिर्याणी शिजवण्यासारखा आहे.
- मलिक यांनी तसाच प्रयत्न केला.
- पण त्यात काहीच तथ्य नाही.
- राज्य सरकारच्या यंत्रणा कामाला लागूनही ते फडणवीसांवर आरोप लावू शकले नाहीत.
गुन्हेगारांना राजाश्रय हा तुमचा धंदा!
- “हो हे खरंय. मुन्ना यादव, हाजी हैदर, हाजी अराफत हे तिघेही पक्षाचे कार्यकर्ते आहेत.
- त्यांना विविध बोर्डावर अध्यक्ष म्हणून बसवलं होतं.
- यापैकी हाजी अराफत आणि हाजी हैदर यांच्यावर एकही गुन्हा नाही.
- त्यांची पूर्णपणे चौकशी केल्यानंतरच त्यांच्या कायदेशीरपणे नेमणूका झाल्या होत्या.
- मुन्ना यादव यांच्यावर एक आरोप आहे, त्याचं स्पष्टीकरण ते स्वतः करतील.
- मला माहीत असलं तरी यामधील राष्ट्रवादी काँग्रेसचं कनेक्शन ते स्वतःच सांगतील.
- हे सगळं सोडलं तर गेल्या दोन वर्ष तुमचं सरकार आहे.
- विशेषतः तुमच्या पक्षाच्या नेत्यांकडे गृहमंत्री पद आहे. आज तुम्ही ज्यांच्यावर गंभीर आरोप करताय.
- त्या हाजी अराफत आणि हाजी हैदर यांच्यावर गेल्या दोन वर्षांत एक साधा अदखलपात्र गुन्हाही नोंद करु शकला नाही.
सामान्य माणसांना फसवण्याचा, लटकवण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा धंदा!
- ज्या पद्धतीनं आरोप केला त्यातलं सत्य हे आहे की, त्या प्रकरणात पकडला गेलेला इमरान आलम शेख हा हाजी अराफतचा भाऊ होता.
- तो काँग्रेसचा तत्कालीन सचिव होता. जेव्हा त्याच्यावर आरोप झाले, त्याला अटक झाली त्यावेळी तो काँग्रेसचा सचिव होता.
- आणि आता ज्यावेळी मलिक आरोप करत आहेत, त्यावेळी तो राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे. हाजी हैदर स्वतः पत्रकार परिषदा घेणार आहेत.
- गेल्या २ वर्षांत बांग्लादेश सोडाच मुंबईतील कोणत्याही भागात त्यांनी कोणता गुन्हा केल्याचीही नोंद नाहीये.
- त्यामुळे सामान्य माणसांना फसवण्याचा, लटकवण्याचा जो राष्ट्रवादी काँग्रेसचा धंदा आहे, त्या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून आरोप करण्याचा प्रयत्न मलिकांनी केला.
रियाझ भाटीला कुणी लपवलं?
- पंतप्रधान कार्यालय किंवा पंतप्रधान कार्यक्रम यांच्याशी रियाझ भाटी संबंध आणि कार्यक्रम नाही.
- फोटोवरुन संबंध प्रस्थापित करायचे असतील तर मी रियाझ काझीचे फोटो दाखवतो म्हणत रियाझ भाटीचे शरद पवार,उद्धव ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण, आदित्य ठाकरे, अस्लम शेख यांच्यासोबतचे फोटो आशिष शेलार यांनी दाखवले.
- रियाझ भाटीशी देवेंद्र फडणवीसचा संबंध असण्याचं कारण नाही.
- क्रिकेटच्या राजकारणात रियाझ भाटीला कुणी स्थान दिलं यासंदर्भात मोठ्या नेत्याचं नाव घेणार नाही.
- रियाझ भाटीला सुरक्षित स्थळी पळवून ठेवण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेसनं तर केलं नाहीना.
- सचिन वाझेच्या चौकशीत रियाझ भाटीचं नाव आल्यानं त्याला राष्ट्रवादी काँग्रेसनं लपवला आहे का?
जावयासाठी राजकारणाच्या नीच पातळीवर जाऊ नका!
- नवाब मलिक यांनी स्वत: ला मानिसकदृष्ट्या शांत करावं.
- जावयासाठी राजकारणाच्या नीच पातळीवर जाऊ नका.
- नवाबी पातळीवर राजकारण नेऊ नका.
- राज्यातील अल्पसंख्याक समाजातील कार्यकर्ते, नेतृत्व नेस्तनाभूत करण्याच काम तुम्ही करताय का?
- शाहरुख खान, आर्यन खान, अस्लम शेख यांचं नाव यात आणण्याचा प्रयत्न नवाब मलिक करत आहेत.
- नवाब मलिक हाजी अराफत आणि हाजी हैदर यांना बदनाम करण्याचं काम नवाब मलिक करत आहेत.
- हा शुद्ध कट आहे, नवाब मलिक यांनी त्याचं उत्तर द्यावं.