Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“मुंबईला हे धोक्याचे इशारे तर नाही ना?”

मुख्यमंत्र्यांनी तातडीने तज्ज्ञांसह लोकप्रतिनिधींची बैठक बोलवावी, भाजपा नेते आमदार अॅड आशिष शेलारांची मागणी

July 19, 2021
in घडलं-बिघडलं
0
Ashish shelar

मुक्तपीठ टीम

भांडूप जलशुद्धीकरण केंद्रात पहिल्यांदाच पाणी शिरले. समुद्राला भरती नसताना मिठी नदीला पूर आला. ओहोटी असताना मिठी नदीचे पाणी ओसरत नाही…गेली २५ वर्षे मी लोकप्रतिनिधी म्हणून काम करत आहे. या २५ वर्षात असं कधीच घडले नाही. त्यामुळे हे मुंबईसाठी भविष्यातील धोक्याचे इशारे तर नाही ना? याबाबत तातडीने विचार होण्याची गरज आहे, अशी अपेक्षा भाजपचे नेते आशिष शेलार यांनी व्यक्त केली.

 

आमदार अॅड आशिष शेलार यांनी आज माध्यमांशी बोलताना मुंबईत पावसामुळे होत असलेल्या बदलावर सविस्तर भाष्य केले. मुंबईत धोकादायक विदारक चित्र निर्माण झाले आहे. काल परवापासून मुंबईची स्थिती चिंताजनक आहे. मुंबई धोकादायक उंबरठ्यावर असल्याचंच दिसून येत आहे. मिठी नदी समुद्राकडे पाणी घेऊन जात असते. समुद्राला भरती आली तरच मिठी नदी भरते. काल पहिल्यांदा समुद्राला भरती नसताना मिठी नदीला पूर होता. लोकांच्या घरात पाणी गेलं. याचा अर्थ काय? भांडूपरच्या जलशुद्धीकरण केंद्रातही पाणी शिरले. २६ जुलैच्या पावसातही भांडूप शुद्धीकरण केंद्रात पाणी शिरले नव्हते. त्यामुळे हे संकेत आहेत. हे धोकादायक आहे, असेही अॅड शेलार म्हणाले.

 

मुंबईत या दोन घटना पहिल्यांदाच घडल्या. लोकप्रतिनिधी म्हणून मी गेली २५ वर्षे काम करत आहे. माझ्या कार्यकाळात असं कधी पाहिले नाही. यावेळी दिसणारे बदल हे धोकादायक वाटत आहेत. या घटना म्हणजे मुंबईवर येऊ घातलेल्या मोठ्या संकटाचे संकेत तर नाही ना?, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी तातडीने नगरसेवक, आमदार, खासदार, पालिकेचे अधिकारी आणि या विषयातील तज्ज्ञांची बैठक बोलावून आढावा घ्यावा. नंतर हळहळ करण्यात अर्थ नाही, असंही ते म्हणाले. ज्या अधिकाऱ्यांना हे धोके कळले नाहीत. त्यांचीच काल मुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊन आढावा घेतला आहे, असंही ते म्हणाले.

 

नरबळीचा प्रस्ताव आणणार का?

एवढे सगळे अधिकारी असताना मुंबईत दुर्घटना झाल्याच कशा? असा सवाल करतानाच दुर्घटना झाल्यानंतर पालिकेत प्रस्ताव होतो. आता नरबळी घेतल्यावर विकासाचे प्रस्ताव करणार आहात का?; असा संतप्त सवाल ही आमदार अॅड आशिष शेलार यांनी केला केला आहे.

हा राजकारण करायचा मुद्दा नाही. लोककारण करावं लागेल. पालिका प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे काल बळी गेले. पालिकेने ११२ टक्के नालेसफाईचा दावा केला होता. पण तरीही ३१ लोक दगावले. त्याला जबाबदार कोण? ही नालेसफाई नाही. तर हात सफाई आहे. मिठी नदीबाबतही आम्हाला शंका आहे, असं ते म्हणाले. मुंबईतील धोकादायक भिंती, कट्टे, इमारती, डोंगराळ भाग याचं महिन्याभरापूर्वीच सर्वेक्षण करायला हवं होतं. पण पालिकेने हे सर्वेक्षण केलं नाही. पालिका नागरिकांचं ऐकत नाही. नगरसेवकांचं ऐकत नाही. त्यांना जनतेला मृत्यूच्या दारात पाटावर आणून ठेवायचं आहे काय? शिवसेनेच्या पालिकेने हे करून ठेवलंय, अशी टीकाही त्यांनी केली आहे.

 


Tags: chief minister uddhav thackeraymumbaimybmcshiv senaअॅड आशिष शेलारभांडूप जलशुद्धीकरण केंद्रमिठी नदीमुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Previous Post

पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतरही विरोधकांनी संसदेत गोंधळ का घातला?

Next Post

अंथरुणाला खिळून असलेल्या रुग्णांसाठी घरपोच लसीकरणाची सुविधा

Next Post
vaccination

अंथरुणाला खिळून असलेल्या रुग्णांसाठी घरपोच लसीकरणाची सुविधा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!