Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अखेर आर्यन खानची सुटका…सुटकेपूर्वी तुरुंगात नेमकं काय झालं?

September 6, 2026
in कायदा-पोलीस, घडलं-बिघडलं
0
aryan khan

मुक्तपीठ टीम

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान अखेर तुरुंगातून बाहेर आला आहे. खरंतर गुरुवारी जामीन मिळूनही ठरलेल्या मुदतीत कागदपत्रे न मिळाल्याने त्याच्या सुटकेला आणखी दोन दिवसांचा वेळ लागला. अखेर आर्यनच्या जामीनाचे लेखी आदेश उच्च न्यायालयातून सत्र न्यायालयातील विशेष एनडीपीएस न्यायालयात गेले. तेथे पुढील प्रक्रिया करून ते मुंबईतील ऑर्थर रोड तुरुंगात पाठवण्यात आले. तेथे असलेल्य बेल बॉक्समध्ये ते टाकण्यात आले. त्याची शनिवारी सकाळी खातरजमा केल्यानंतर आर्यन खानची अखेर तुरुंगातून सुटका झाली आहे.

 

  • ड्रग्स प्रकरणी जामीन मिळाल्यानंतरही आर्यनला मुंबईतील आर्थर रोड तुरुंगात आणखी दोन रात्री काढाव्या लागल्या.
  • आर्यन खान काही वेळापूर्वीच तुरुंगातून बाहेर आला आहे.
  • तो आता शाहरुख खानच्या नावावर नोंदणी अससेल्या काळ्या गाडीतून मन्नतच्या दिशेने रवाना झाला आहे.
  • मन्नतजवळ शाहरुख खानचे चाहत्यांची गेले काही दिवस मोठी गर्दी असते.

 

आर्यन खानच्या सुटकेचे आदेश रात्री बेल बॉक्समध्ये, सकाळी तुरुंग अधिकाऱ्यांकडे…

  • आर्यन खानच्या सुटकेचे आदेश शुक्रवारी रात्री तुरुंगाच्या बेल बॉक्समध्ये आला.
  • शनिवारी सकाळी साडेपाच वाजता तुरुंग अधिकाऱ्यांनी तो आदेश ताब्यात घेतला.
  • त्याची खातरजमा केल्यानंतर सुटकेची प्रक्रिया सुरु करण्यात आली.

 

आर्यन खानची ओळख परेड

  • आर्यन खानला तीन ऑक्टोबरला अटक झाल्यानंतर सर्वत्र त्याच्याविषयीच चर्चा सुरु होती. मात्र शनिवारी आर्थर रोड तुरुंगातून बाहेर आल्यावर त्याला हजारो कैद्यांमधील ओळख परेडमधूनही जावे लागले आहे.
  • त्याच्या अटकेच्या दिवशी त्याच्या शरीराच्या काही खुणा त्याच्या कागदपत्रांमध्ये त्याला अटक करणाऱ्या तपास यंत्रणेला लिहून ठेवल्या असाव्यात.
  • जसे अनेकांच्या शरीरावर तीळ आणि चामखीळ असतात.
  • आर्यनला तुरुंगात पाठवण्यात आले तेव्हा एनसीबीने त्याच्याविषयीची माहिती असलेली फाईलही त्याच्यासोबत पाठवली होती.
  • आर्यनला तुरुंगात दाखल करुन घेण्यापूर्वी त्याच्या शरीरावरील खुणा जुळल्या का ते तपासले गेले.
  • आता सुटकेपूर्वीही पुन्हा आर्यनच्या शरीरावरील खुणा एनसीबीने दिलेल्या रेकॉर्डशी जुळवल्या गेल्या.
  • त्यानंतरच आर्यन खानची तुरुंगातून सुटका करण्यात आली आहे.

Tags: Aryan KhanDrug racketjailmuktpeethNCBआर्यन खानएनसीबीड्रग्ज रॅकेटमुक्तपीठ
Previous Post

हेमंत टकले यांचे लेखन अंतःकरणाचा ठाव घेणारे; शरद पवार यांचे उद्गार

Next Post

अख्खा महाराष्ट्र राष्ट्रवादीमय करण्याचे आमचे ध्येय आहे आणि आपल्या मदतीने आम्ही ते करणारच – जयंत पाटील

Next Post
jayant patil

अख्खा महाराष्ट्र राष्ट्रवादीमय करण्याचे आमचे ध्येय आहे आणि आपल्या मदतीने आम्ही ते करणारच - जयंत पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!