Wednesday, June 4, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आर्यन खान एनसीबी तपासाचा चौकशी अहवाल धक्कादायक, समीर वानखेडे पुन्हा चर्चेत!

October 19, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
aryan khan drug case

मुक्तपीठ टीम

बॉलिवूड अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान प्रकरणाच्या तपासाची नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ने केलेल्या अंतर्गत चौकशीत धक्कादायक माहिती समोर आल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये झळकत आहेत. आर्यन खानसंबंधित प्रकरणाच्या चौकशीमध्ये एनसीबीला अनेक त्रुटी आढळल्या आहेत. एनसीबी दक्षता विभागाच्या विशेष चौकशी पथकाने आपला अहवाल दिल्ली मुख्यालयाला सादर केला आहे. या अहवालात अनेक अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करण्यात आला असून या प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीने झाला नसल्याचेही म्हटले आहे. आतापर्यंत नेमक्या कोणत्या अधिकाऱ्यांवर कारवाई होईल, हे स्पष्ट नसले तरी सतत प्रसिद्धीच्या झोतात राहत नंतर वादग्रस्तही ठरलेले अधिकारी समीर वानखेडे पुन्हा चर्चेत आले आहेत.

आर्यन खान तपासाची चौकशी कशी झाली?

  • एनसीबीच्या दक्षता पथकाला तपासात विभागातील सात-आठ अधिकाऱ्यांविरुद्ध गंभीर दक्षता त्रुटी आणि अनियमितता आढळून आली आहे.
  • तपासादरम्यान, पथकाने ६५ साक्षीदार तपासले आणि त्यांचे जबाब नोंदवले.
  • या सर्व साक्षीदारांचे जबाब कॅमेऱ्यात रेकॉर्ड करण्यात आले आहेत.
  • यासोबतच दक्षता पथकाने खंडणीचा तपास करण्यासाठी शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी हिचा जबाबही नोंदवला आहे.
  • मात्र, वसुलीचे कोणतेही पुरावे संघाला मिळालेले नाहीत.

समीर वानखेडेंच्या नेृतत्वाखालील कारवाई शाहरुखच्या मुलामुळे गाजली

  • मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझवर समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखालील एनसीबी पथकाने २ ऑक्टोबर २०२१ रोजी अचानक छापा टाकला होता.
  • यादरम्यान शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान यालाही अटक करण्यात आली.
  • अनेक दिवस तुरुंगात राहिल्यानंतर आर्यनला जामीन मिळू शकला.
  • अलीकडेच गौरी खानही या विषयावर उघडपणे बोलली.
  • आम्ही ज्या टप्प्यातून जात आहोत त्यापेक्षा वाईट काहीही असू शकत नाही, पण एक कुटुंब म्हणून आम्ही नेहमीच एकमेकांच्या पाठीशी उभे आहोत, असे ते म्हणाले होते.

दोषी आढळल्यास काय कारवाई?

  • विभागीय चौकशीदरम्यान दक्षता पथकाला काही गडबड आढळून आल्यास त्या आधारे एनसीबीतील तत्कालीन अधिकाऱ्यांवर शिक्षेची शिफारस केली जाऊ शकते.
  • चौकशीत एखाद्या अधिकाऱ्याची चूक गंभीर असल्याचे आढळून आल्यास त्याला सेवेतून काढून टाकण्याची शिफारस केली जाऊ शकते.
  • या तपासाच्या चौकशीत अनेक आक्षपार्ह गोष्टी आढळल्याची चर्चा असल्यानं आता नेमक्या कोणत्या अधिकाऱ्यांवर कारवाई होते की राजकीय संरक्षणामुळे ते वाचतात, अशी चर्चा रंगू लागली आहे.

Tags: NCBआर्यन खान क्रुझ प्रकरणनार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमहाराष्ट्र
Previous Post

ओलाची आता स्वस्त ई-कार!

Next Post

बच्चू कडूंचा नाव न घेता संताप, खिसा कापून किराणा वाटणारे महाठग! लक्ष्य राणा?

Next Post
Bacchu Kadu Navnaeet rana And Ravi rana

बच्चू कडूंचा नाव न घेता संताप, खिसा कापून किराणा वाटणारे महाठग! लक्ष्य राणा?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!