मुक्तपीठ टीम
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अबकारी धोरणातील कथित भ्रष्टाचार प्रकरणात विजय नायरला अटक केल्याबद्दल भाजपावर टीका केली आहे. उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना पुढील आठवड्यात अटक होण्याची भीतीही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे. यावेळी केजरीवाल यांनी सिसोदिया यांचे खोटे नाव घेण्यासाठी विजय नायर यांच्यावर दबाव आणल्याचे सांगितले.
अरविंद केजरीवाल म्हणाले की, या लोकांना वाढत्या महागाईची चिंता नाही. त्याऐवजी वाढत्या आलेखांमध्ये आम आदमी पार्टी (AAP) ‘आप’ला चिरडण्याचा प्रयत्न करत आहे. दिल्ली आणि पंजाबप्रमाणे गुजरातमध्येही ‘आप’ जिंकेल, अशी भीती भाजपाला आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी ज्यांना भीती वाटते त्यांनी पक्ष सोडावा असा सल्ला दिला.
अरविंद केजरीवाल यांची भविष्यवाणी-
- आप’चे विजय नायर यांना अटक करण्यात आली.
- पंजाबच्या निवडणुकीत नायरने चांगली कामगिरी केली.
- आता ते गुजरातचे काम पाहत होते.
- गेल्या काही दिवसांपासून मनीष सिसोदिया यांचे खोटे नाव घ्या, अन्यथा अटक होईल, असा दबाव त्यांच्यावर होता.
- नायर यांचा दारू घोटाळ्याशी काय संबंध?
- महिन्याभरात दोनदा त्यांच्या घरावर छापे टाकण्यात आले, तिथेही काहीही मिळाले नाही.
- सिसोदिया यांच्या बँक लॉकरची झडती घेण्यात आली मात्र काहीही सापडले नाही.
- सत्येंद्र जैन, अमानतुल्ला आणि विजय नायर यांना खोट्या खटल्यांमध्ये अटक करण्यात आली आहे. पुढील आठवड्यात सिसोदियाला अटक करणार आहे.
भाजपाची रणनीती ओळखून आधीच गौप्यस्फोट!
- आम आदमी पार्टी ही सार्वजनिक जीवनात चारित्र्याच्या मुद्द्याला कमालीच्या आक्रमकतेनं मांडते.
- काँग्रेसप्रमाणेच ते भाजपावरही ते जनतेला लुटल्याचा आरोप करतात.
- काँग्रेस व अन्य विरोधकांना चोर ठरवत भाजपा स्वच्छ चारित्र्याचा दावा करते, मात्र, आपचा आक्रमक स्वच्छतावाद त्यांना अडचणीत आणतो.
- त्यामुळेच भाजपा आपल्या पक्षाला, नेत्यांना बदनाम करण्याची रणनीती राबवतो, असा आपचा आरोप आहे.
- त्यामुळेच आपचे केजरीवाल ती रणनीती निकामी करण्यासाठी आधीच आक्रमकतेने भाजपाचं लक्ष्य असणाऱ्या आप नेत्यांची नावं मांडत आहेत.
- अरविंद केजरीवाल म्हणाले की, हे लोक (केंद्र सरकार) छोट्या कार्यकर्त्याला तुरुंगात टाकतील.
- तुरुंगात जाण्याची भीती वाटत असेल तर आजच पक्ष सोडा.
- इंग्रजांनी २०० वर्षात जेवढी लूट केली नाही त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त ७५ वर्षात देश लुटला गेला आहे.
- आपण दुसरे स्वातंत्र्य युद्ध लढत आहोत.
- भगतसिंग यांनी देशाला इंग्रजांपासून मुक्त करण्यासाठी लढा दिला.
- मी शपथ घेतो की मी देशासाठी सर्वोच्च बलिदान देईन.
- देशभर फिरणाऱ्या आमदारांना विकत घेणाऱ्यांपासून देशाला मुक्त करायचे आहे.
- पूर्वी एका राजकीय पक्षाने (काँग्रेस) लुटले, आता दुसरा पक्ष (भाजप) लुटत आहे.
- त्यांच्यापासून देशाला वाचवायचे आहे.
- तुरुंगात जाण्याची भीती वाटत असेल तर त्यांच्या पक्षात जा.