मुक्तपीठ टीम
दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे निमंत्रक अरविंद केजरीवाल आजपासून आपल्या दोन दिवसीय गुजरात दौऱ्यावर आहेत. त्यांच्यासोबत सीबीआयच्या निशाण्यावर असलेले दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया देखील असतील.सीबीआयने शुक्रवारी सिसोदिया यांच्या सरकारी निवासस्थानावर छापा टाकला. त्यानंतरही या दोन्ही नेत्यांनी गुजरात दौरा रद्द केलेला नाही. या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होणार असलेल्या गुजरातमध्ये आपचं मिशन गुजरात सुरुच राहणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
अरविंद केजरीवाल यांचा गुजरातमधील कार्यक्रम !!
- गुजरातसाठी ‘आप’ने आतापर्यंत आपल्या १९ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.
- केजरीवाल आणि सिसोदिया आज अहमदाबादमध्ये आहेत.
- नजीकच्या हिमतनगर शहरात पक्षाच्या टाऊनहॉल बैठकीतही ते उपस्थित राहणार आहेत.
- मंगळवारी आपचे दोन्ही नेते भावनगर येथील टाऊन हॉलच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
- दिल्लीप्रमाणे गुजरातमध्येही आप शिक्षण आणि आरोग्य हमी योजना राबवण्याची योजना मांडत आहे.
अरंविद केजरीवाल यांचं ट्वीट!!
- केजरीवाल यांनी ट्विट केले की, “शिक्षण आणि आरोग्याची हमी देण्यासाठी मनीष जी आणि मी दोन दिवस गुजरातला जाणार आहोत.
- दिल्लीप्रमाणे गुजरातमध्येही चांगल्या शाळा, चांगली रुग्णालये आणि दवाखाने बांधले जातील.
- राज्यात सर्वांना मोफत चांगले शिक्षण आणि चांगले उपचार मिळणार आहेत.
- लोकांना दिलासा मिळेल, तरुणांशीही आम्ही बोलू.
मनीष सिसोदिया यांच्या घरावर सीबीआयचा छापा
- अरविंद केजरीवाल यांचे वक्तव्य मनीष सिसोदिया यांच्या घरावर सीबीआयने टाकलेल्या छाप्याच्या एका दिवसानंतर आले आहे.
- यापूर्वी अरविंद केजरीवाल यांनी आपल्या गुजरात दौऱ्यात जनतेला अनेक आश्वासने दिली होती.
- यामध्ये मोफत वीज तसेच आरोग्य सेवांमध्ये सुधारणा करण्याच्या आश्वासनांचा समावेश होता.
- गुजरातमध्ये या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होणार आहेत.
- आपने आतापर्यंत आपल्या उमेदवारांच्या दोन याद्या जाहीर केल्या आहेत.
- या दोन यादीत एकूण १९ उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत.
- गुजरात विधानसभेत एकूण १८२ जागा आहेत.
- ‘आप’ने २ ऑगस्ट रोजी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती.
- १८ ऑगस्ट रोजी दुसरी यादी जाहीर केली.