Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

९ ऑगस्टला दादासाहेब फाळके यांच्या पुतळ्याशेजारी रंगकर्मींचं अनोखं आंदोलन

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
actor's (1)

निकेत पावसकर

सोमवारी ९ ऑगस्ट क्रांतीदिनी सकाळी १० वाजता हिंदमाता सिनेमा समोर भारताचे चित्रपट निर्माते स्व.दादासाहेब फाळके यांच्या दादर येथील अर्धपुतळ्या शेजारी सर्वच कलाकार “जागर रंगकर्मीचा ” हा कार्यक्रम सादरकरुन आपल्या मागण्यांमागील आक्रोश आनोख्या पध्दतीने राज्य सरकारच्या निदर्शनास आणून देणार आहेत ! देशात कोरोना महामारी सुरू होऊन गेल्या सव्वा वर्षा पासून हातावर पोट घेऊन जगणारे रंगकर्मी देशोधडीला लागले आहेत.तर असंख्य कलाकार कामाअभावी मेटाकुटीला आले आहेत.या मागण्यांच्या पूर्ततेसाठी गेल्या सहा महिन्यापासून लोकप्रिय अभिनेते विजय पाटकर, विजय राणे, संचित जाधव यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्राभर सुरू झालेले आक्रोश आंदोलन आता कलाकारांच्या वर्षोनुवर्षाच्या दशावतारावर स्थिरावले आहे.मेघा घाडगे,विजय राणे, संचित जाधव, सुभाष जाधव ,चंद्रशेखर सांडवे, हरी पाटणकर, प्रमोद मोहिते, शीतल माने ,कृष्ण कुमार गावंड,सदानंद राणे आदींनी महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यात सभा घेऊन,निर्मात्यांसह, विविध पारंपरिक रंगकर्मी, चित्रपट, नाटक, मालिकां मधील कलाकार तसेच हिंदी आणि मराठी वाद्यवृंदातील वादक, गायक, निर्माते, शाहीर, तमासगीर, ढोल ताशे, बेंजो पार्टी, बुकिंग क्लार्क, नाट्य व्यवस्थापक,नाट्य वितरक,रंगमंच कामगार, तंत्रज्ञ यासर्वांना एकत्र आणून मोठे संघटन उभे केले आहे. दिनांक ५ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता नायगाव येथील अंकुर बुद्धविहार येथे विविध कला क्षेत्रातील संघटकांची सभा झाली. त्यावेळीअभिनेते विजय पाटकर म्हणाले, कलाकारांच्या मागण्या़वर महाराष्ट्रातील ३५ जिल्ह्यात प्रथमच एकाचवेळी आंदोलन ९ ऑगस्ट रोजी छेडले जाणार आहे.हा ऐतिहासिक योगायोग असून हे आंदोलन राजकारण आणि संस्था विरहित आहे.कोणी अध्यक्ष नाही. कोणी सेक्रेटरी नाही.हे फक्त कलाकारांनी कलाकारांसाठी सुरु केलेले हे आंदोलन आहे.तसेच अभिनेते विजय पाटकर पुढे म्हणाले,कोरोना किती काळ रहाणार हे माहीत नाही,पण या पुढे आईच्या किवा स्वतःच्या आजरात लाख दीड लाख रुपये लागले तर कधीच दुसऱ्यावर अवलंबून रहाता येऊ नये, यासाठी आता स्वतःच्या पायावर उभे रहाण्यासाठी संघटना मजबूत करावी लागणार आहे .या द्वारे कलाकारांना मी कोण आहे,याची ओळख करुन देण्याची वेळ आली आहे, असेही अभिनेते विजय पाटकर आपल्या भाषणात म्हणाले.

actor's (2)

यावेळीसंचित जाधव यांनी सांगितले, आंदोलन कलाकारांच्या आजवरच्या उज्वल किर्तीला शोभेल असे शांततेने पार पडेल.सर्व स्तरातील कलाकारांच्या एकूण १४ मागण्या सरकारपुढे ठेवण्यात येणार आहेत.सात मागण्या लॉकडाऊन मधील भीषण समस्येवर आहेत. तसेच सात मागण्या कलाकारांच्या आयुष्यभराच्या व्यथेवर आधारीत आहेत.याप्रसंगी विजय राणे यांनी सांगितले की,सात मागण्यांमध्ये माथाडी कामगारांच्या धरतीवर रंगकर्मी बोर्ड, रंगकर्मी हमी योजनाची मागणी करण्यात आली आहे.या प्रसंगी अनेक संस्था प्रमुखांनी आंदोलनाला आपला पाठिंबा जाहीर केला आहे.अभिनेत्री मेघना घाडगे यांनी उपस्थितांचे आभार मानले.सरकारने सहानुभूतीपूर्वक या आंदोलनाचा विचार केला नाही, तर आमरण उपोषण करण्याचा इशारा या प्रसंगी देण्यात आला आहे.


Tags: coronaDadasaheb falkestate governmentकलाकारकोरोनादादासाहेब फाळकेराज्य सरकार
Previous Post

व्हॉट्सअॅप करा आणि लसीकरण प्रमाणपत्र मिळवा! समजून घ्या सोपी पद्धत…

Next Post

आघाडी सरकारचं काम म्हणजे ‘जाऊ तिथं खाऊ!’ – आ. सदाभाऊ खोत

Next Post
sk

आघाडी सरकारचं काम म्हणजे 'जाऊ तिथं खाऊ!' - आ. सदाभाऊ खोत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!