मुक्तपीठ टीम
देशाची कृषी व्यवस्था मजबूत करण्यासाठी सरकारने कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानावर काम करण्याची योजना आखली आहे. एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने, कृषी कार्यक्षमता सध्याच्या तुलनेत अनेक पटींनी वाढविली जाईल. शेतजमीन, पेरणी, कापणी आदींबरोबरच बियाणांच्या सुधारित वाणांचा शोध घेतला जाईल. २०५० पर्यंत जगाची एकूण लोकसंख्या १० अब्जांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. कृषी उत्पादनाची गरज भागवण्यासाठी सध्याची जमीन आणि जलस्रोत सांभाळण्साठी केंद्र सरकारच्या जैवतंत्रज्ञान विभागाने शास्त्रज्ञांकडून प्रस्ताव मागवले आहेत. कृषी कार्यक्षमता वाढवण्यासाठी एआय तंत्राने सुसज्ज नवीन संशोधनांचा संपूर्ण खर्च सरकार उचलणार आहे.
हे बदल एआय तंत्रज्ञानातून होणार!
- डिबीटीनुसार, एआय तंत्रज्ञानाशी संबंधित संशोधनानंतर पीक उत्पादनात वाढ होईल.
- एआय इमेज डेटासेट वापरून सिंचन, कीटकनाशक उपचार, पेरणी, मातीची गुणवत्ता सुधारणे आणि पिकांचे रोग शोधण्यात मदत करेल.
- या तंत्रज्ञानाद्वारे कापणीमध्ये रोबोटचा वापर करण्यासाठी उपकरणे तयार केली जातील.
- सरकारी आणि खाजगी क्षेत्र तसेच एआया तंत्रांपासून बनवलेली साधने आणि धोरणे शेतकऱ्यांसोबत सामायिक केली जातील.
- भविष्यात राज्य सरकारांच्या सहकार्याने शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्याची योजना आहे.
- जेणेकरून शेतकऱ्यांना त्यांच्या कार्यशैलीमध्ये सहज समाविष्ट करता येईल.