Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अर्णब गोस्वामींना लवकरात लवकर अटक करा! अतुल लोंढे

January 25, 2021
in घडलं-बिघडलं
0
अर्णब गोस्वामींना लवकरात लवकर अटक करा! अतुल लोंढे

मुक्तपीठ टीम

 

मुंबई पोलिसांनी केलेल्या तपासातून रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी आणि बार्कचे अधिकारी पार्थो दासगुप्ता यांच्यातील व्हाट्सअप चॅटमधील अनेक गंभीर बाबी उघड झाल्या आहेत. ५१० पानांच्या या चॅटमध्ये न्यायाधिशांना विकत घेण्याची भाषा केली आहे, हे अत्यंत गंभीर असून न्यायव्यवस्थचे स्वातंत्र्य अबाधित होते त्याला कुठेतरी डाग लावण्याचा प्रयत्न झाल्याचे दिसत आहे. न्यायाधिशांनी स्वेच्छाधिकाराने याची दखल घेणे गरजेचे होते परंतु जनतेचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास उडू नये यासाठी चौकशी होणे गरजेचे असून त्यासाठी अर्णब गोस्वामीला लवकरात लवकर अटक करुन सत्य जनतेसमोर आणावे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.

 

अतुल लोंढे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन कारवाई करण्याची मागणी केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, “अभिनेता सुशांतसिंह राजपुतचे प्रकरण पाटण्यातून मुंबईला हलवण्याची रिया चक्रवर्तीची याचिका सुप्रीम कोर्टात होती ती मान्य करण्यात आली नाही त्यामागे अर्नब गोस्वामी होते असे या चॅटमधून दिसते. तसेच टीआरपी प्रकरणात दिग्गज वकील न्यायालयात बाजू मांडणार आहेत तुम्ही न्यायाधिशांना विकत घ्या असा सल्ला देण्यात आलेला आहे. या लोकांनी न्याय व्यवस्थेतही घुसखोरी केली असून न्यायाधीशही विकत घेतले जाऊ शकतात असा संदेश जनतेत जात आहे. यातून सरन्यायाधिश यांच्या कारकिर्दीवरही बोट ठेवल्यासारखे आहे. न्यायव्यवस्थेचे पावित्र्य व स्वातंत्र्य अबाधित राहिले पाहिजे.

 

यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले की,या चॅटमध्ये हरकत घेण्यासारखे अनेक मुददे आहेत. न्यायव्यवस्थेला स्वतःच्या स्वार्थासाठी खरेदी करता येऊ शकते असे त्या चॅटमध्ये आलेले आहे ते अत्यंत गंभीर आहे. न्याय पालिकेवर लोकांचा विश्वास आहे त्यातील न्यायाधिश विकत घ्या, असा सल्ला देणे अत्यंत गंभीर असून त्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन गृहमंत्र्यांनी दिले.


Tags: amit shahaarnab goswamiHome Ministermumbai policerepublic tvsushant singh rajputगृहमंत्रीगृहमंत्री अमित शाहामुंबई पोलिसरिपब्लिक टीव्हीसुशांतसिंह राजपुत
Previous Post

“शेतकरी आंदोलनाला पब्लिसिटी स्टंट म्हणणाऱ्या आठवलेंनी माफी मागावी!”

Next Post

Fixed Income Outlook Of January 2021 By Tata Mutual Fund

Next Post
Fixed Income Outlook Of January 2021 By Tata Mutual Fund

Fixed Income Outlook Of January 2021 By Tata Mutual Fund

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!