मुक्तपीठ टीम
तामिळनाडूतील कुन्नूर येथे लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले आहे. या हेलिकॉप्टरमध्ये चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत देखील प्रवास करत होते असे सांगण्यात येत आहे. मात्र, अद्याप त्याची अधिकृत पुष्टी झालेली नाही. पाचच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार हेलिकॉप्टरमधील चौदांपैकी तेरा जणांचा मृत्यू ओढवला आहे. डीएनए चाचण्यांनंतर ओळख अधिकृत जाहीर करणार आहेत.
या हेलिकॉप्टरमध्ये ११ जण प्रवास करत होते, त्यापैकी ३ जणांना बाहेर काढण्यात यश आले आहे. बातमीनुसार, सीडीएस बिपिन रावत एका व्याख्यानमालेत सहभागी होणार होते. त्यासाठी ते पत्नीसह हेलिकॉप्टरने प्रवास करत होते. सध्या तिथं कोसळल्यानंतर आग लागलेल्या हेलिकॉप्टरची आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहे.
सीडीएस बिपीन रावत यांचा अपघात झाला ते Mi-17V5 हेलिकॉप्टर आहे तरी कसं?
राष्ट्रीय चॅनलवरील माहितीनुसार या दुर्घटनेनंतर स्थानिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न सुरु केला. काही काळातच तिथं पोहचलेल्या इमर्जंसी रेस्क्यू टीमने बचावाचे काम सुरु केले. हेलिकॉप्टरमधील तिघांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले आहे. ते तिघेही गंभीर जखमी असल्याचे सांगितले जाते.
\
c
An IAF Mi-17V5 helicopter, with CDS Gen Bipin Rawat on board, met with an accident today near Coonoor, Tamil Nadu.
An Inquiry has been ordered to ascertain the cause of the accident.— Indian Air Force (@IAF_MCC) December 8, 2021
यापूर्वीही झाला होता सीडीएस बिपिन रावतांच्या हेलिकॉप्टरला भीषण अपघात…