मुक्तपीठ टीम
येत्या नवीन वर्षाच्या सुरूवातीला जानेवारी महिन्यात होणाऱ्या रणजी ट्रॉफीसाठी मुंबईने आपला संघ जाहीर केला आहे. निवडकर्त्यांनी टीम इंडियाचा महान फलंदाज आणि क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरचाही समावेश केला आहे. टीमची कमान मुंबईच्या धडाकेबाज फलंदाजांपैकी एक पृथ्वी शॉकडे सोपवण्यात आली आहे. रणजी ट्रॉफीच्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये पृथ्वी शॉ मुंबई क्रिकेट संघाचे नेतृत्व करणार आहे. यशस्वी जैस्वाल, मिडल ऑर्डर फलंदाज सर्फराज खान आणि अनुभवी विकेटकीपर फलंदाज आदित्य तारे यांना २० सदस्यीय संघात स्थान मिळाले आहे.
अर्जुन तेंडुलकरचा आतापर्यंतचा क्रिकेट प्रवास
- गेल्या वर्षी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसाठी अर्जुन तेंडुलकरचा मुंबई संघात समावेश करण्यात आला होता.
- त्याने मुंबईकडून हरियाणाविरुद्ध पदार्पण केले, त्यानंतर त्याला पुद्दुचेरीविरुद्ध खेळण्याची संधी मिळाली.
- २ सामन्यात अर्जुनला गोलंदाजीत २ विकेट घेता आल्या. त्याच वेळी, वेगवान गोलंदाज अर्जुन तेंडुलकरचे आयपीएल २०२० साठी मुंबई इंडियन्सने २० लाखांमध्ये त्याच्या संघात समावेश केला होता.
- मात्र त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. दुखापतीमुळे अर्जुनला मधल्या स्पर्धेतून माघार घ्यावी लागली, नंतर त्याच्या जागी समरजित सिंगचा समावेश करण्यात आला.
आयपीएलचा मेगा लिलाव २०२२ च्या फेब्रुवारीमध्ये होणार आहे आणि त्याआधी रणजी टूर्नामेंट खेळली जाणार आहे. आयपीएल संघांच्या नजराही या स्पर्धेवर असतील. यामध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना मेगा लिलावात मोठी बोली लागू शकते.
२० सदस्यीय संघात पुढीलप्रमाणे खेळाडू असणार
- पृथ्वी शॉ (कर्णधार)
- यशस्वी जैस्वाल
- ड्र्यू गोमेल
- अरमान जाफर
- सरफराज खान
- सचिन यादव
- आदित्य तारे (डब्ल्यूके)
- हार्दिक तामोरे (डब्ल्यूके)
- शिवम दुबे
- अमन खान
- शम्स मुलानी
- तनुष कोटियन
- प्रशांत सोलंकी
- शशांक अत्तर्डे
- धवल कुलकर्णी
- मोहित अवस्थी
- प्रिन्स बदियानी
- सिद्धार्थ राऊत
- रॉयस्टन डायस
- अर्जुन तेंडुलकर