मुक्तपीठ टीम
नागपूरच्या नाग नदीला प्रदूषणमुक्त करणाऱ्या प्रकल्पाला मंजुरी मिळाली आहे. या प्रकल्पासाठी २,११७.५४ कोटी रुपये खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे. नागपूर शहरातून वाहणारी ही नदी सांडपाणी आणि औद्योगिक कचर्यामुळे अत्यंत प्रदूषित झाली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकारामुळे अखेर नागनदी प्रदूषणमुक्तीच्या योजनेसाठी निधीचा प्रवाह सुरु झाला आहे.
राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेंतर्गत हा प्रकल्प राष्ट्रीय नदी संरक्षण संचालनालय राबवणार आहे. नाग नदीत आणि तिच्या उपनद्यांमध्ये सांडपाणी, घनकचरा आणि अन्य अशुद्ध घटक सोडण्यात येत असल्यामुळे ती प्रदूषीत झाली. या प्रकल्पाअंतर्गत पहिल्या टप्प्यात १ हजार ३६२ किलोमीटर सांडपाणी वाहिन्यांचे काम करण्यात येणार आहे.
नाग नदीसाठी कुठून येणार निधी?
केंद्र सरकारला जायकाकडून ०.९५ टक्के व्याजदराने ३० वर्षांसाठी १ हजार ८२० कोटी रुपये कर्ज मिळणार आहे. यात महापालिकेला ८ वर्षांत २९६ कोटी रुपयांचा वाटा द्यावा लागणार आहे.
केंद्र सरकारकडून १ हजार ३२३ कोटी रुपये (६० टक्के), राज्य सरकारकडून ४९७ कोटी रुपये (२५ टक्के), महापालिकाकडून २९६ कोटी रुपये (१५ टक्के) इतका निधी मिळणार आहे. हा प्रकल्प पाच वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट महापालिकेचे आहे.
पाहा व्हिडीओ: