Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पैठण व औरंगाबाद तालुक्यातील १७८ गावांच्या ग्रामीण नळ पाणी पुरवठा योजनांना प्रशासकीय मान्यता

रोहयो मंत्री संदिपान भुमरे यांच्या पाठपुराव्याला यश

January 6, 2022
in घडलं-बिघडलं, सरकारी बातम्या
0
जल जीवन मिशन अंतर्गत विविध पाणीपुरवठा योजनांना प्रशासकीय मान्यता प्रदान 2

मुक्तपीठ टीम

रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांच्या पाठपुराव्याने जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत पैठण व औरंगाबाद तालुक्यातील १७८ गावे या ग्रीड पाणी पुरवठा योजनेच्या ३०७.०६५ कोटी इतक्या किंमतीच्या अंदाजपत्रकास जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत प्रशासकीय मान्यता देण्यात आली.

            

मंत्रालयात जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत पैठण व औरंगाबाद तालुक्यातील १७८ गावे या ग्रीड पाणी पुरवठा योजनेविषयी बैठक आयोजित करण्यात आली होती.

            

याबैठकीस पर्यटन, पर्यावरण आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे (दूरदृश्य प्रणालीद्वारे), पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, आमदार अंबादास दानवे, औरंगाबाद जिल्हा परिषदेचे माजी सभापती विलास भुमरे उपस्थित होते.

            

रोहयो मंत्री संदिपान भुमरे म्हणाले, वॉटर ग्रीड पाणी पुरवठा योजनेच्या कामास लवकरच सुरुवात होणार आहे. पैठण आणि औरंगाबाद तालुक्यातील १७८ गावातील लोकांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे. ही योजना तात्काळ कार्यान्वित करण्यासाठी पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी सूचना दिल्या असल्याने लवकरात लवकर योजना पूर्ण होवून लोकांना पाणी मिळणार आहे.

            

पैठण तालुक्यातील १७८ गावांतील ५५ लिटर दरडोई दरदिवशी क्षमतेच्या रु. ६ हजार २७२ इतका दरडोई खर्च व सुट धरून दरडोई खर्च रू. १ हजार ६६५ असलेल्या नळ पाणी पुरवठा योजनेच्या रु. ३०७.०६५ कोटी इतक्या किमतीच्या अंदाजपत्रकास व आराखड्यास जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत अटी व शर्तीची पूर्तता करण्याच्या अधीन राहून प्रशासकीय मान्यता देण्यात असल्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.


Tags: AurangabadGulabrao PatilJal Jeevan MissionMaharashtraPaithansandipan bhumreऔरंगाबादपैठणसंदिपान भुमरे
Previous Post

जल जीवन मिशन अंतर्गत विविध पाणीपुरवठा योजनांना प्रशासकीय मान्यता प्रदान

Next Post

बार्टीने खरच अनुसूचित जाती, बौद्धांचे हित साधले आहे का?

Next Post
BARTI OFFICE

बार्टीने खरच अनुसूचित जाती, बौद्धांचे हित साधले आहे का?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!