मुक्तपीठ टीम
औरंगाबाद येथील महावितरण कंपनीत इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या पदांसाठी एकूण ७४ जागांसाठी भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ०६ डिसेंबर २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणाऱ्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता, आयटीआय किंवा एनसीव्हीटी असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारास वयाची अट नाही आहे.
शुल्क
ही भरती ऑफलाइन पद्धतीने होणार असल्याने या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अर्ज सादर करण्यासाठीचा पत्ता
अधीक्षक अभियंता, महावितरण कार्यालय, शहर मंडळ औरंगाबाद विद्युत भवन जून पवार हाउस कंपाऊड, ज्युब्ली पार्क, औरंगाबाद
अधिक माहितीसाठी महावितरणाच्या अधिकृत वेबसाइट https://www.mahadiscom.in/ वरून माहिती मिळवू शकता.