मुक्तपीठ टीम
पश्चिम रेल्वेत या पदासाठी १० जागा, प्रकल्प सहकारी दोन फिटर, वेल्डर (जी अॅन्ड इ), टर्नर, मशिनिस्ट, कारपेंटर, पेंटर (जनरल), मेकॅनिक (डिझेल), मेकॅनिक (मोटार व्हेईकल), सीओपीए/ पीएएसएए, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, वायरमन, रेफ्रिजरेटर अॅन्ड एसी मेकॅनिक, पाईप फिटर, प्लंबर, ड्राफ्ट्समन (सिव्हिल), स्टेनोग्राफर (इंग्रजी) अशा एकूण ३,५९१ जागांसाठी ही करिअर संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २४ जून २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात. या रोजगारसंधीविषयी अधिक माहितीसाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com वरील नोकरी-धंदा-शिक्षण कॅटेगरी तपासा.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार, १) ५०% गुणांसह १०वी उत्तीर्ण २) संबंधित ट्रेड मध्ये एनसीव्हीटी/ एससीव्हीटी असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १५ ते २४ वर्ष असावे.
शुल्क
या पदासाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी उमेदवारांकडून १०० रूपये शुल्क आकारले जाईल तर, एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी पश्चिम रेल्वेच्या अधिकृत वेबसाइट https://wr.indianrailways.gov.in/ वरून माहिती मिळवू शकता.