मुक्तपीठ टीम
महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत १) इलेक्ट्रिशियन, फिटर, वायरमन, वेल्डर, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, एमएमटीएम, एमएमव्ही, कोपा, आयसीटीएसएम, मेसन, टर्नर, मशिनिस्ट, मशिनिस्ट ग्राइंडर, पंप ऑपरेटर कम मेकॅनिक, डिझेल मेकॅनिक, ट्रॅक्टर मेकॅनिक, ऑपरेटर ॲडव्हान्स मशिन टुल्स, आणि स्टेनोग्राफर-इंग्लिश या ट्रेडमध्ये आयटीआय अॅप्रेंटिस, २) इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रॉनिक या ट्रेडमध्ये पदवीधर अॅप्रेंटिस ३) इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल या ट्रेडमध्ये डिप्लोमा अॅप्रेंटिस या पदांसाठी एकूण २४८ जागांसाठी अॅप्रेंटिसशिपची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २६ नोव्हेंबर २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण महाराष्ट्र चंद्रपूर आहे.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार,
- पद क्र.१- संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय उत्तीर्ण असणे.
- पद क्र.२- संबंधित विषयात इंजिनीअरिंग पदवी
- पद क्र.३- संबंधितविषयात इंजिनीअरिंग डिप्लोमा असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय पदांनुसार आणि नियमानुसार असणे आवश्यक आहे.
शुल्क
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य वीज निर्मितीच्या अधिकृत वेबसाइट https://www.mahagenco.in/ वरून माहिती मिळवू शकता.
नोकरीची लिंक
https://www.apprenticeshipindia.gov.in/
अधिकृत जाहिरात
https://drive.google.com/file/d/1xnnEEf1_m_VJCEyEbG3kFd_caXosfwKq/view








Subscribe