मुक्तपीठ टीम
सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन म्हणजेच सीबीएसईने त्यांच्या सिंगल गर्ल चाइल्ड स्कॉलरशिप योजनेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. बोर्डाने या योजनेबाबत अधिसूचना जारी केली आहे. यासह अर्जही सुरू झाले आहेत. ही शिष्यवृत्ती मिळवू इच्छिणारे विद्यार्थी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाइट cbse.gov.in वर जाऊन अर्ज सादर करू शकतात.
अर्ज करण्याची अंतिम तारीख
- केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सिंगल गर्ल चाइल्ड स्कॉलरशिपसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
- त्याचवेळी, यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १४ नोव्हेंबर २०२२ निश्चित करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करावेत.
अर्ज करण्यासाठी पात्र असणारे उमेदवार कोण?
- ज्या मुली त्यांच्या पालकांचे एकुलते एक अपत्य आहेत त्या सिंगल गर्ल चाइल्ड स्कॉलरशिपसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत.
- CBSE द्वारे मान्यताप्राप्त शाळेत विद्यार्थी इयत्ता १०वीमध्ये असणे आवश्यक आहे.
- शिष्यवृत्ती रिन्यू करण्यासाठी इयत्ता १०वीमध्ये किमान ६० टक्के आणि ११वीमध्ये ५० टक्के किंवा त्याहून अधिक गुण असणे आवश्यक आहे.
- ज्या शाळेची मासिक फी रु. १ हजार ५०० पेक्षा जास्त नसेल अशा शाळेतून विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या पाहिजेत.
- अधिक तपशीलांसाठी, उमेदवार अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध अधिसूचना तपासू शकतात.
महत्त्वाच्या तारखा जाणून घ्या…
- शिष्यवृत्तीसाठी अर्ज सुरू झाल्याची तारीख- १४ ऑक्टोबर २०२२
- शिष्यवृत्ती अर्ज १४ नोव्हेंबर २०२२ रोजी संपेल
- शिष्यवृत्तीसाठी पडताळणी २१ ऑक्टोबर ते २१ नोव्हेंबर पर्यंत करू शकतात.
अर्ज करण्याची प्रक्रिया?
- सर्वप्रथम उमेदवार अधिकृत वेबसाइट cbse.gov.in ला भेट देतात.
- आता मुख्यपृष्ठावर दिसणार्या शिष्यवृत्तीशी संबंधित लिंकवर क्लिक करा.
- आता तुम्ही एका नवीन पेजवर याल.
- विनंती केलेली माहिती प्रविष्ट करून येथे लॉग इन करा.
- आता सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे अनुसरण करा आणि माहिती प्रविष्ट करा आणि सबमिट करा.
- अर्ज डाऊनलोड करा आणि पुढील गरजांसाठी त्याची प्रिंट आउट घ्या.