मुक्तपीठ टीम
जगातील आघाडीची टेक कंपनी Appleने भारतातून आपली कमाई दुप्पट केली आहे. Appleची कमाई ८३ अब्ज डॉलर झाली आहे. ही वार्षिक आधारावर २ टक्के वाढ आहे. हा आकडा २०२२ च्या जून तिमाहीचा आहे. कंपनीचे सीईओ टिम कुक यांनी स्पष्ट केले की, आयफोन आणि आयपॅड भारतात चांगली कामगिरी करत आहेत. त्याच वेळी, Apple वॉच देखील आपल्या सेगमेंटमध्ये भारतात चांगली कामगिरी करत आहे.
अपेक्षेपेक्षा महसूल जास्त!
- Appleने अलीकडेच आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये २५ जून रोजी संपलेल्या तिसऱ्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले.
- कंपनीने सांगितले की त्यांची कमाई $८३ अब्ज आहे.
- जी वर्षभरात दोन टक्क्यांनी वाढली आहे.
- कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी टिम कुक यांनी स्पष्ट भाष्य केले की, पुरवठा साखळीतील व्यत्यय आणि रशियामधील व्यवसायावर परिणाम यासारखी अनेक आव्हाने असल्याने महसूल त्याच्या अपेक्षेपेक्षा जास्त आहे.
- अमेरिका, युरोप आणि उर्वरित आशिया पॅसिफिक प्रदेशाने जून तिमाहीसाठी उत्कृष्ट परिणाम दाखवले आहेत.
- विकसित आणि उदयोन्मुख अशा दोन्ही बाजारांमध्ये जून तिमाहीचे चांगले परिणाम दिसून आले आहेत.
- यापैकी ब्राझील, इंडोनेशिया आणि व्हिएतनामने मजबूत दुहेरी अंक वाढ नोंदवली आणि भारतातील महसूल जवळपास दुप्पट झाला.