मुक्तपीठ टीम
अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीनं कोरोना संकटातील गरजूंच्या मदतीसाठी काम चालवले आहे. दोघांनी मिळून स्वत:चे पैसे तर दिलेच, पण क्राउडफंडिंगच्या माध्यमातून ११ कोटी रुपयांचा निधीही उभारला. ते तेवढ्यावरच थांबलेले नाहीत. आता अनुष्का एका वेगळ्या कामात गुंतली आहे. कोरोना संकटात गरोदर असणाऱ्या महिलांना खूप अडचणी येत असतात. ते ओळखून अनुष्काने त्यांना आवश्यकता भासली तर मदत मिळेल अशी माहिती शेअर केली आहे. नुकतीच तिने कोरोना काळात गरोदर महिलांना २४ तास मदत देणारा एक हेल्पलाइन नंबर पोस्ट केला आहे. महिला आयोगाच्या हेल्प टू हेल्प हेल्पलाइन नंबरसह ईमेल आयडीदेखील शेअर केला आहे. हेल्पलाईनचा व्हॉट्सअॅप नंबर ९३५४९५४२२४ आहे, तर ईमेल आयडी helpatncw@gmail.com आहे. या सेवेप्रमाणेच अनुष्काचे वर्णनही हॅप्पी टू हेल्प असेच करावे लागेल.
हॅप्पी टू हेल्प
अनुष्का शर्माने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये सांगितले आहे की, राष्ट्रीय महिला आयोगाने ‘हॅप्पी टू हेल्प’ उपक्रमांतर्गत गर्भवती आणि नुकत्याच आई बनलेल्या महिलांना वैद्यकीय मदत देण्यासाठी एक हेल्पलाइन नंबर सोशल मीडियाच्या माध्यमातून दिला आहे. वैद्यकीय मदत देण्यासाठी एनसीडब्ल्यू टीम २४ तास उपलब्ध असेल.
ईमेल आयडी-व्हॉट्सअॅप नंबर
अनुष्काने हेल्पलाइन नंबरसह ईमेल आयडीदेखील शेअर केला आहे. हेल्पलाईनचा व्हॉट्सअॅप नंबर ९३५४९५४२२४ आहे, तर ईमेल आयडी helpatncw@gmail.com आहे.
अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्याच्या या कोरोना संकट काळात समाजकार्याच्या प्रयत्नात आहे. अलीकडेच अनुष्का आणि तिचा पती क्रिकेटपटू विराट कोहली या दोघांनी कोरोना रिलीफसाठी क्राउडफंडिंगच्या माध्यमातून अकरा कोटी निधी गोळा केला. त्यांनी स्वत:ही २ कोटींची मदत केली. या व्यतिरिक्त आता तिने गर्भवती व नुकत्याच आई बनलेल्या महिलांच्या मदतीसाठी माहितीही पुरवण्यास सुरुवात केली आहे.
अनुष्काने तिचा पती भारतीय कर्णधार विराट कोहलीसोबत कोरोना रिलीफसाठी ११ कोटींचा निधी जमा केला आहे. अनुष्काने मदतीच्या आवाहनाचा व्हिडीओ इन्स्टाग्राम हँडलवरून शेअर करुन याची सुरूवात केली होती.
पाहा व्हिडीओ: