पूजा शिंदे / मुक्तपीठ टीम
अनुराधा पौडवाल हे नाव ऐकल की आपल्याला आठवतात ९० च्या दशकातील लोकप्रिय गाणी. ९० च्या दशकातील अनेक गाण्यांमधुन अनुराधाजींचा आवाज आपण ऐकला आहे. यासोबतच भक्तीरसामधील देखील अनेक गाणी अनुराधाजींनी गायली आहेत. संगीत क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी त्यांना पद्मश्री पुरस्काराने पुरस्कृत करण्यात आले आहे. अशा या आवडत्या गायिकेचा आज वाढदिवस आहे.
अनुराधा पौडवालांची संगीत यात्रा
- अनुराधाजींनी बॉलीवुडच्या ‘अभिमान’ (१९७३) या चित्रपटातील गाण्यांमधुन इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले.
- हिंदीतील अनेक गाण्यांसोबतच ‘यशोदा’ या मराठी चित्रपटातील गाण्यांमुळे त्यांना लोकप्रियता मिळण्यास सुरुवात झाली.
- तामिळ, ओडिया, नेपाळी, बंगाली आणि कन्नड चित्रपटांमध्ये देखील त्यांनी गाणी गायली आहेत.
- त्यांनी अनेक भक्तीगीत गायली आहेत.
- एके काळी प्रत्येक चित्रपटामध्ये अनुराधाजींचे गाणे असायचे.
भक्तीरसातील गाण्यांना दिले प्राधान्य
- अनुराधाजींनी करियरच्या महत्वाच्या टप्प्यावर असताना इतर गाण्यांपेक्षा भक्तीरसातील गाण्यांना प्राधान्य दिले.
- या निर्णयामुळेच त्यांची लोकप्रियता कमी झाली असे म्हटले जाते.
- रोमँटिक गाणी गाणाऱ्या अनुराधाजींना ऐकण्याची संधी केवळ भक्ती गाण्यांमधुन मिळु लागली.
- याबद्दल त्यांना प्रश्न विचारल्यावर त्यांनी एका मुलाखती दरम्यान सांगितले की, “चित्रपटातील संगीत बदलले आहे, पुर्वी संगीत सिनेमाचा आत्मा असे. परंतु आता चित्रपटांमधील गाणी गाताना तो आनंद मिळत नाही, असा आनंद मला भक्तीरसातील गाणी गाऊन मिळतो. “
- याच वेळी त्यांनी फक्त टी-सिरीज सोबत गाणार असल्याची घोषणा केली.
- यामुळे इतर गायिकांना याचा फायदा झाला.
लता मंगेशकरांची फॅन ते थेट त्यांच्याशीच तुलना
- लता मंगेशकरांची फॅन असल्याचे तसेच त्यांची गाणी ऐकून प्रॅक्टिस केल्याचे अनुराधाजींनी एका मुलाखतीत सांगितले होते.
- अनुराधाजींनी त्यांच्या आवाजाने सर्वांचे मन जिकंले, इतके की त्यांची तुलना लता मंगेशकरांशी होऊ लागली.
- अनुराधाजींना आशिकी, दिल है की मानता नही आणि बेटा या चित्रपटांमधील गाण्यांसाठी ३ फिल्मफेर अवॉर्ड्स मिळाले आहेत.
- भारतीय संगीताला अनुराधाजींनी उत्तमरित्या सादर केले असे म्हटले जाते.
गाण्याप्रमाणेच समाजकार्यातही अग्रेसर
- अनुराधा पौडवाल सध्या समाजकार्यात व्यस्त दिसुन येतात.
- त्या त्यांचा पुर्ण वेळ समाजकार्यासाठी देत आहेत.
- इंदोर स्थित सूर्योदय आश्रमासोबत मिळुन त्या सामाजिक कार्य करत आहेत.
- शेतकरी आणि शहीद सैनिकांच्या परिवारासाठी त्या सातत्याने कार्यरत असतात.
- जलसंचय, मुलांचे शिक्षण, गरीब कुटुंबांना रोजगार अशा सुविधा देण्यासाठी त्या काम करत आहेत.
- “ही सर्व कामे मनाला शांती देतात”, असे त्यांनी सांगितले.