Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

का आहे अंनिसचा वैद्यकीय शिक्षणातील कौमार्य चाचणीला विरोध?

कौमार्य चाचणी विषय वैद्यकीय अभ्यासक्रमातून हद्दपार, महा अंनिसकडून स्वागत

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
ans

मुक्तपीठ टीम

बलात्कार पीडित महिलांची कौमार्य चाचणी वैद्यकीय तज्ज्ञाकडून घेतली जाते. ती कशी घ्यावी हे वैद्यकीय अभ्यासक्रमात शिकवले जाते. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील व कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी एका निवेदनाद्वारे आक्षेप घेऊन सदर विषय अभ्यासक्रमातून वगळण्याची मागणी केली होती. त्याची दखल घेउन महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांनी सदर निर्णय अभ्यासक्रमातून वगळला असल्याचा निर्णय घेतला असल्याचे कळविले आहे, महा अंनिसच्यावतीने त्याचे स्वागत करण्यात आले आहे. तसेच आता देशभरात तसे करण्यासाठी अंनिस प्रयत्न करणार आहे.

 

कौमार्य चाचणीसाठीच्या ‘टू फिंगर टेस्ट’ विरोध का?

  • वैद्यकशास्त्राच्या एमबीबीएसच्या द्वितीय वर्षाच्या न्यायवैद्यकशास्त्र या विषयाच्या अभ्यासक्रमात ‘टू फिंगर टेस्ट’चा उल्लेख आहे.
  • त्यानुसार बलात्कार पिडीत स्त्रीच्या योनीची बोटाने किंवा प्रोबने तपासणी करून तिच्यावर संभोग झाला किंवा नाही ते ठरविले जाते. स्त्रीच्या कौमार्य पटलाचे माप व योनी मार्गाची लवचिकता याचे परीक्षण केले जाते.
  • परंतु ही चाचणी अवैज्ञानिक व अशास्त्रीय आहे, असा दावा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केला होता.
  • अभ्यासक्रमात खरी कुमारी व खोटी कुमारी याचे काही निकष दिले आहे, ते आक्षेपार्ह आहेत.

 

  • कौमार्य चाचणी ही केवळ स्त्रीची केली जाते. पण पुरुषांच्या कौमार्य चाचणीचा यात उल्लेख नाही.
  • कौमार्यता हा मुळात खूपच वैयक्तिक विषय आहे.
  • कौमार्य चाचणीच्या नावाखाली स्त्रीच्या मानवी हक्कांचे उल्लंघन होते.
  • मुळात सध्या अशा प्रकारची चाचणी बलात्कारासारख्या गुन्ह्यांनंतरही केली जात नाही.

 

महाराष्ट्राच्या काही भागातील काही समाजातील कौमार्य भंग चाचणीचे अनेक प्रकार उघडकीस आले आहेत. आमच्या पुढाकार व प्रयत्नाने राज्य सरकारने केलेल्या सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा अंतर्गत त्यातील काही घटनांत रितसर गुन्हे दाखल केले गेले आहेत.

 

योनीतील पातळ पडदा खेळतानाही फाटू शकतो!

  • वैज्ञानिकदृष्टीने कौमार्यभंग चाचणीचा व चारित्र्याचा काहीही संबंध नाही.
  • सामान्यत: खेळताना, सायकल चालवताना, व्यायाम करताना योनीतील पातळ पडदा फाटू शकतो, असे वैद्यकीय तज्ज्ञही सांगतात. महा अंनिसच्यावतीनं तसे शास्त्रीय प्रबोधनही समाजात केलं जात असतं.
  • मात्र, अश कुप्रथांना उत्तेजन देण्याचे काम आपल्या वैद्यक शास्त्राच्या अभ्यासक्रमातून होत आहे, असा कौमार्य चाचणीलाविरोधामागील मु्द्दा आहे.

 

कौमार्य चाचणी ही अवैद्यकीय असल्याचे अनेक तज्ञ डॉक्टरांच्या बोलण्यातून पुढे आले आहे. वर्धा येथील सेवाग्राम रुग्णालयाचे प्रा. डॉ. इंद्रजित खांडेकर यांनी अशा आशयाचा अहवाल दिला आहे.

 

जात पंचायतींकडून होत असलेल्या कौमार्य चाचणीवर महा अंनिसच्या जात पंचायतीच्या मूठमाती अभियानाच्या पुढाकारामुळे सामाजिक बहिष्कार विरोधी कायद्याने बंदी घालण्यात आली आहे. वैद्यकशास्त्रात कोणतेही संशोधन न झालेली कौमार्य चाचणी हा विषय अभ्यासक्रमातुन काढून टाकण्यात यावा, अशी मागणी महा अंनिसने केली होती. आता देशस्तरावर अस्तित्वात असलेल्या मेडिकल कौन्सिलच्या अभ्यासक्रमातून हा विषय काढून टाकण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे अविनाश पाटील व कृष्णा चांदगुडे यांनी म्हटले आहे.


Tags: 2 fingers testANSकौमार्य चाचणीटू फिंगर टेस्टमहाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ
Previous Post

मातंग समाजातील विद्यार्थ्यांनो सोडू नका संधी, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्तीसाठी अर्ज करा!

Next Post

बहुचर्चित कथासंग्रह ‘पाणी पाणी’, आता ऐका स्टोरीटेलवर!

Next Post
pani pani

बहुचर्चित कथासंग्रह 'पाणी पाणी', आता ऐका स्टोरीटेलवर!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!