मुक्तपीठ टीम
नाशिक औरंगाबाद महामार्गाव बसला आग लागून १२ जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच नाशिकमध्येच आणखी एका बसला आग लागली. नांदूरहून वणी गडावर बस जात असताना एसटी बसला आग लागली. सुदैवाने वेळीच प्रवाशांनी बाहेर उड्या टाकल्या, त्यामुळे जीवितहानी झाली नाही. परंतु नाशिकमधील आजच्या दिवसात बसने पेट घेतल्यामुळे खळबळ उडाली आहे.
नाशिकमधील आणखी एका बसला आग
- आज दुपारी नांदुरीहुन वनी गडावर ही बस येत होती.
- गडाकडे येत असताना अचानक बसला आग लागली.
- बसमधील सर्व प्रवाशांनी लगेच बसमधून खाली उड्या टाकल्या.
- त्यामुळे बस मधील सर्व प्रवाशी सुखरूप बचावले आहे.
- स्थानिकांनी धाव घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला.
- घटनेची माहिती अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली.
नाशिकमधील बस जळीत मृत्यू कांड
- आज सकाळी बस, डंपर व टेम्पो यांच्यात हा विचित्र अपघात झाला.
- अपघातानंतर डिझेलची टाकी फुटल्याने बसने पेट घेतल्याचे सांगितले जाते.
- अपघातग्रस्त बस चिंतामणी ट्रॅव्हलची असल्याची प्राथमिक माहिती आहे.
- पहाटे पाचच्या सुमारास पंचवटीतील हॉटेल मिरची चौकात तिला कोळश्याने भरलेल्या डंपरने धडक दिली.
- अपघातानंतर बसने पेट घेतला.
- गाठ झोपेत असणारे प्रवाशांचा अक्षरश कोळसा झाला. बसमध्ये ३० हून अधिक प्रवासी होते.
- यामध्ये सुमारे ११ जणांचा मृत्यू झाला.
- त्यांच्यामध्ये एक लहान मुलासह आई आहे.
- तर २५ जण जखमी झाले आहेत.
- काहींनी उड्या मारल्याने ते बचावल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
- अर्धा ते पाऊण तास पेटलेली बस विझवण्याचे प्रयत्न सुरू होते.
- मृत प्रवाशांचे मृतदेह मनपाच्या सिटीलिंक बसमधून हलविण्यात आले.