मुक्तपीठ टीम
राज्य सरकारने महाराष्ट्रातील सुपरमार्केटमध्ये वाईन विक्री करण्याचा निर्णय घेतल्यानंतर अनेकांनी टीका केली आहे. दरम्यान ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी या निर्णयाविरोधात आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा दिला आहे. येत्या १४ फेब्रुवारीपासून राळेगणसिद्धी येथील यादवबाबा मंदिरात आमरण उपोषण करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
काय म्हणाले अण्णा हजारे?
- अण्णा हजारे यांनी वाईनविक्रीच्या निर्णयाविरोधात यापूर्वीही सरकारला उपोषणाचा इशारा दिला होता.
- मात्र , सरकारकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने अण्णा हजारे यांनी उपोषणाचा निर्णय घेतला आहे.
- आपल्या संस्कृतीचे जतन व्हावे म्हणून आमच्या साधूसंतानी, राष्ट्रीय महापुरुषांनी अतोनात प्रयत्न केला.
- दुकानांमध्ये वाईन आली तर ही संस्कृती धुळीला मिळेल आणि चंगळवादी, भोगवादी संस्कृती वाढीला लागेल.
- त्यातून काय काय अनर्थ घडतील सांगता येत नाही.
- ती अधोगतीकडे नेणारी संस्कृती पहायला नको म्हणून मी १४ फेब्रुवारी रोजी मी राळेगणसिद्धीमध्ये श्री संत यादवबाबा मंदिरात बेमुदत उपोषण करीत आहे.
राज्य सरकारच्या निर्णयाला भाजापाचा विरोध
- महाराष्ट्रात सुपरमार्केटमध्ये दारू विक्रीला परवानगी देण्यात आली.
- यासाठी राज्य मंत्रिमंडळाने ठराव मंजूर केला.
- ठाकरे सरकारच्या या निर्णयामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे.
- भाजपानेही या निर्णयावर टीका केली होती.
- या निर्णयावर टीका करताना भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला ‘मद्य-राष्ट्र’ बनवल्याचा आरोपही केला.