Monday, June 9, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

‘अंकनाद राज्यस्तरीय पाढे पाठांतर व सात्मीकरण स्पर्धा पर्व -३ चे आयोजन

November 28, 2021
in घडलं-बिघडलं
0
Ankanaad

मुक्तपीठ टीम

महाराष्ट्र शासन, राज्य मराठी विकास संस्था आणि मॅप एक कम्युनिकेशन्स प्रा. लि. पुणे याच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अंकनाद राज्यस्तरीय पाढे पाठांतर सात्मीकरण स्पर्धा पर्व-३ नावनोंदणी सुरु झाली आहे. महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांना उत्तेजन देण्यासाठी, गणित विषयाची गोडी निर्माण होण्यासाठी राज्य शासनाच्या सहभागाने मॅप एपिक कम्युनिकेशन्स प्रा. लि. आणि राज्य मराठी विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या अंकनाद राज्यस्तरीय पाढे पाठांतर व सात्मीकरण स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे हे तिसर पर्व आहे.

 

स्पर्धेच्या पहिल्या दोन पर्वांना विद्यार्थ्यांचा उल्लेखनीय प्रतिसाद लाभला. पर्व ३ साठी नावनोंदणीस राज्यभर 8 नोव्हेंबरपासून सुरुवात झाली असून १५ डिसेंबर पर्यंत मुदत आहे. पाठ्यांचे व्हीडीओ २५ नोव्हेंबर पासून ३१ डिसेंबरपर्यंत मिळालेल्या लिंकवर अपलोड करता येणार आहेत.

 

मराठी परंपरा संवर्धनाचा विषय असल्याने महाराष्ट्र राज्य शासनाने मराठी भाषा विभागाच्या राज्य मराठी विकास संस्थामार्फत सह-आयोजक या नात्याने या स्पर्धा आयोजनात सहभाग घेतला आहे. अंकनाद पाढे पाठांतर स्पर्धेतून मुलांच्या बुद्धिमत्तेला चालना मिळते आणि अंकनादच्या संगीतमय पाढ्यांमुळे मुलांचे पाढे सहज ऐकून आत्मसात होतात. त्याचे परीक्षण होणे गरजेचे आहे. त्यासाठी अंकनाद तर्फे पाढे पाठांतर व सात्मीकरण स्पर्धा ही संपूर्ण महाराष्ट्रात आयोजित केली जाते. जिल्हा पातळी, राज्य पातळीवर स्पर्धा घेतली जाईल. ही स्पर्धा मराठी भाषेतून घेतली जाईल. सर्व माध्यमाच्या विद्यार्थ्यांना पाढे पाठांतर स्पर्धा खली राहील विद्यार्थी कोणत्याही माध्यमातून शिकत असला तरी स्पर्धा मराठी भाषेतूनच होईल. पाढे पाठांतर स्पर्धा महाराष्ट्रातील सर्वस्तरातील विद्यार्थ्यासाठी आहे.

स्पर्धेचे नियोजन

जिल्हापातळीवर स्पर्धक आपल्या गटानुसार सांगितलेले पाढे म्हणतानाचा व्हिडीओ मिळालेल्या लिंक वर अपलोड करावा. परीक्षकांकडून त्याचे परीक्षण केले जाईल

राज्यपातळीवर

परीक्षणानंतर गटनिहाय यशस्वी विद्यार्थ्यांना पायांवर आधारीत गणितीय आकडेमोड यावर आधारित प्रश्न विचारून तोंडी परीक्षण करण्यात येईल.

 

बक्षिसे

व्हिडिओ अपलोड केलेल्या सर्व स्पर्धकांना प्रशस्तिपत्र दिले जाईल आणि राज्यपातळीवरील यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशस्तिपत्र आणि प्रत्येक गटात १९ हजार, ७ हजार, ५ हजार अशी पहिल्या ३ क्रमांकांना भारतीय टपाल विभागाचे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र दिले जाणार आहेत. ही स्पर्धा महाराष्ट्रातील सर्व स्तरातील विद्यार्थ्यासाठी आणि सर्व सामान्य जनतेसाठी खुली आहे. त्यासाठी अंकनाद अॅपद्वारे फॉर्म भरून नोंदणी करु शकतील, अंकनाद अॅप गुगल प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे. स्पर्धेचे स्वरूप आणि नियम www.mahaaanknaad.com या वेबसाइटवर बघायला मिळतील, असे संचालक, राज्य मराठी विकास संस्था संजय कृष्णाजी पाटील यांनी कळविले आहे.

 

स्पर्धेचा अभ्यासक्रम

  • बालगट (बयोगट ४ ते ६) पहिली साठी अंक उच्चार १ ते १००
  • दुसरी, तिसरी साठी १ ते १० पाढ़े, ११ से २० पाढे, २१ ते ३० पाढे
  • चौथी पाचवी साठी पावकी, निमकी
  • सहावी, सातवी साठी पाऊणकी, सवायकी,
  • आठवी, नववी, दहावी साठी दिडकी, अडीचकी, औटकी आणि एकोत्रे
  • खुला गट आणि शासकीय कर्मचारी गटांसाठी पाऊणकी, सवायकी, दिडकी, अडीचकी, औटकी आणि एकोत्रे

Tags: 'अंकनाद राज्यस्तरीय पाढे पाठांतर व सात्मीकरण स्पर्धा पर्व -३Ankanad State Level table recitation and Satmikaran Competition Festival-3Map A Communications Pvt. Ltd. PuneSanyukta VidhimanState Marathi Development Societyमहाराष्ट्र शासनमॅप एक कम्युनिकेशन्स प्रा. लि. पुणेराज्य मराठी विकास संस्थासंयुक्त विद्यमान
Previous Post

“सावित्रीबाई व ज्योतिरावांना एकमेकांपासून वेगळे करता येत नाही”

Next Post

व्वा रे एनसीबी! ड्रग कारवाईची माहिती माध्यमांना देताना पुढे…माहिती अधिकारात ‘अधिकृत’ देण्यास मात्र नकार!

Next Post
Anil galgali Sameer wankhede

व्वा रे एनसीबी! ड्रग कारवाईची माहिती माध्यमांना देताना पुढे...माहिती अधिकारात 'अधिकृत' देण्यास मात्र नकार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!